राहुरी रासप मधून नानासाहेब जुंधारे यांना उमेदवारी जाहीर
राष्ट्रीय समाज पक्षाची 2024 विधानसभा पहिली यादी जाहीर
पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांनी माहितीतून बाहेर पडून 288 जागा लढवण्यास निर्णय घेतला असून यामध्ये राहुरी विधानसभा साठी राहुरी तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील सामाजिक चळवळीत काम करणारे नेतृत्व नानासाहेब जुंधारे यांना उमेदवारी जाहीर
राहुरी तालुक्यातील मांजरी गावचे सुपुत्र, जन्मगाव- तमनर आखाडा शिक्षण- मांजरी,राहुरी,नगर,S.Y.B.A व्यवसाय- मोटरसायकल मेकॅनिक, शेती, दूध व्यवसाय 2013 पासून शेतकरी बांधवांच्या शेतीला पूरक पाणी मिळावे म्हणून नदीमध्ये उपोषण करणारे नानासाहेब जुंधारे यांना सामाजिक चळवळीत काम करत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक उपाध्यक्ष सातत्याने अनेक महापुरुषांच्या जयंती उत्सव मध्ये हिरारीने सहभाग त्याचप्रमाणे राष्ट्रीय समाज पक्ष तालुका उपाध्यक्ष 2013,14, तालुका अध्यक्ष 2015, 16 पक्ष संघटन वाढीस काम करत असताना रासप कडून 2017 पंचायत समिती निवडणूक उमेदवारी मिळाली.
त्यात त्यांचा निसटता पराभव झाला तरीही सातत्याने शेतकऱ्याचे समस्या, रस्त्याचे प्रश्न, विजेचे प्रश्न असे अनेक सामाजिक कार्यासाठी आंदोलने केली तसेच सतत सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण,शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव, अनाथ विद्यार्थ्यांना आर्थिक मदत असे अनेक सामाजिक कार्य सातत्याने करत असताना 2018 अहिल्यानगर युवक जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली जिल्ह्यामध्ये युवकांचे संघटन करून मजबूत फळी तयार केली नंतर कोरोनाच्या काळात कुणी एकमेका जवळ जात नव्हते तरीही त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक पेशंटला स्वतःच्या गाडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जाण्याबरोबरच कोविड सेंटर मधील सर्व पेशंटना फल आहार देणे त्यांना सर्व प्रकारे सहकार्य करणे या सर्व कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माननीय महादेवजी जानकर साहेब यांनी 2020 मध्ये त्यांनाअहिल्यानगर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आणि ते सातत्याने कार्य करत राहिले 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभेतील परतुर आणि मंठा या दोन तालुक्याचे निरीक्षक म्हणून चांगली कामगिरी केली.
सध्या स्थितीत जानकर साहेब यांनी महायुतीतून बाहेर पडून संपूर्ण 288 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी पहिली विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर केली त्यामध्ये राहुरी विधानसभेसाठी नानासाहेब जुंधारे यांना उमेदवारी जाहीर केली एक सर्वसामान्य कुटुंबातील सर्व जनतेच्या सुखात दुःखात सहभागी असणाऱ्या सच्चा कार्यकर्त्याला पक्षाने न्याय दिला त्यामुळे त्यांच्या मांजरी गावाबरोबरच तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अतिशय जल्लोष व आनंद व्यक्त केला