राहुरी तालुक्यामध्ये अवैध दारु विक्री करणारे विरूध्द धडक कारवाई 371000 रुपयांचा मुद्देमाल जप्त

राहुरी तालुक्यामध्ये अवैध दारु विक्री करणारे विरुद्ध धडक कारवाई
371000 रुपयांचा मुद्देमाल जप्त
राहुरी पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांची कारवाई.
आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने मा. श्री राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर ,अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर , उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी राहुरी पोनि/श्री संजय ठेंगे यांना पोलीस स्टेशन हददीतील विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशाप्रमाणे पोनि संजय ठेंगे यांनी राहुरी पोलीस स्टेशन नेमनुकिचे पोसई/ धर्मरज पाटील , पोकॉ/ गणेश लिपने , पोहेकॉ/ सोमनाथ जायभाये , पोहेकॉ/ सतिष आवारे , पोहेकॉ/ वाल्मीक पारधी , पोना/ निकम , पोहेकॉ/ सुरज गायकवाड , पोहेकॉ/ राहुल यादव , पोकॉ/ प्रमोद ढाकणे , पोकॉ/ नदिम शेख , पोकॉ/ सतिष कुऱ्हाडे ,पोकॉ/ अंकुश भोसले अशांचे पथक तयार करून राहुरी तालुक्यामधील विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथक रवाना केले होते. राहुरी पोलीस स्टेशनचे पथकाने दिनांक 16/10/2024 रोजी एकुण 4 गुन्हे दाखल करुन 4 आरोपींचे ताब्यातुन 3,71,880 /- रुपये किमतीची गावठी हातभट्टीची तयार दारू, रसायन व देशी विदेशी दारु ,तसेंच 1 कार जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यात 1)यश संजय भोसले वय. 21 रा. चिंचोली फाटा ता. राहुरी 2)दिपक विष्णू गव्हाणे रा. धामोरी फाटा ता. राहुरी 3)राहुल गोरख गायकवाड रा. देवळाली प्रवरा 4)कैलास बाजीराव तेलोरे रा. ब्राह्मणी ता. राहुरी यांचेवर कारवाई केलेली आहे.राहुरी पोलीस स्टेशनचे पथकांमार्फत यापुढे देखील अवैध धंद्याविरुध्द कारवाई चालु राहणार आहे.
सदर कारवाई राकेश ओला ,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे , अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, व शिवपुंजे , उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.