भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत रुपये 62 लाखांचा निधी मंजुर/ ना. तनपुरे

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत रुपये 62 लाखांचा निधी मंजुर/ ना. तनपुरे
राहुरी मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील कोल्हुबाईचे कोल्हार,डमाळवाडी,राघोहिवरे ,दत्ताचे शिंगवे,धारवाडी,भोसे ,सातवड,करंजी येथील मागासवर्गिय वस्ती विकास कामांसाठी 62 लाखांचा निधी मंजुर केला असल्याचे राज्याचे नगरविकास उर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
राहुरी मतदार संघातील पाथर्डी तालुक्यातील गावांमध्ये पुढील प्रमाणे मंजुर कामे कोल्हुबाई कोल्हार मागासवर्गीय वस्तीत पेव्हींग ब्लॉक बसविणे – 6 लाख, डमाळवाडी मागासवर्गीय वस्तीत पेव्हींग ब्लॉक बसविणे – 6 लाख ,राघोहिवरे मागासवर्गीय वस्तीत पेव्हींग ब्लॉक बसविणे – 6 लाख, दत्ताचे शिंगवे मागासवर्गीय वस्तीत पेव्हींग ब्लॉक बसविणे – 6 लाख , धारवाडी मागासवर्गीय वस्तीत पेव्हींग ब्लॉक बसविणे – 6 लाख , भोसे मागासवर्गीय वस्तीत पेव्हींग ब्लॉक बसविणे – 6 लाख , सातवड मागासवर्गीय वस्तीत पेव्हींग ब्लॉक बसविणे – 6 लाख , करंजी येथील मागासवर्गीय वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे – 20 लाख आदि विकास कामासाठी एकुण 62 लाख रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाकडुन मंजुर केला असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले.
अनेक वर्षापासुन या भागातील मागासवर्गीय दलीत वस्तीचा विकास खुंडलेला होता. महाविकास आघाडीचे सरकार येताच विकास कामांचा धडाका सुरु झाला असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले मतदार संघातील विविध विकास कामांसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगत राहुरी नगर पाथर्डी येथील सर्वसामान्य जनतेशी निगडीत प्रश्नांच्या विकास कामांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले असल्याचे मंत्री तनपुरे यांनी नमूद केले.