नोकरी
जि.प.शिक्षीका वनिता नेहुल यांचा सेवापुर्ती निमित्ताने सत्कार.

जि.प.प्रा.
२७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दि.२८ फेब्रूवारी २०२२ रोजी जि.प.प्राथमीक शाळेतून वनिता नेहुल या सेवानिवृत्त झाल्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी उत्कृष्ठ सेवा देत अनेक विद्यार्थी घडवले. त्यांच्या या सेवापुर्तीबद्दल नूकताच टाकळीभान जि.प.शाळेतील शिक्षक वृदांनी त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी टाकळीभान केंद्राचे केंद्रप्रमूख सरदार पटेल, लक्ष्मीवाडी शाळेचे मुख्याध्यापक नामदेव भालदंड उपस्थित होते.
यावेळी बोलताने नेहुल मॅडम म्हणाल्या की, शैक्षणीक क्षेत्रात काम करताने माझे शैक्षणीक क्षेत्राशी ॠणानूबंध जोडले गेले. त्यामुळे या शाळेच्या रंगकामासाठी उत्तरदायीत्व म्हणून मी अकरा हजार रूपयांची देणगी देत असल्याचे सांगून अशाप्रकारे झालेला माझा सेवापुर्ती सोहळा मनाला स्पर्शून गेला असल्याचे सांगीतले.
यावेळी टाकळीभान जि.प.शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अनिल कडू यांनीही शाळेच्या रंगकामासाठी ५००१/ रूपयांची देणगी दिली.
या सेवा पुर्ती सोहळ्यास प्रभारी मुख्याध्यापक अनिल कडू, शिक्षीका संगीता उंडे, निशा भोसले, सुनिता जाधव, उज्वला पाचारणे, जया चव्हाण, शिवाजी पटारे, कुमार कानडे, अशोक काकडे आदी सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.