नवीन शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत….*

*नवीन शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत….*
पुणे जिल्हा परिषद आदर्श शाळा धानोरे या शाळेत आज नवीन शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवशी नवागत विध्यार्थी यांना फेटे बांधून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना पाठयपुस्तक वाटप करण्यात आले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्री संग्राम गावडे यांनी विध्यार्थ्यांना कठीण परिश्रम करून उज्वल यश संपादन करण्याचे आवाहन केले तसेच विध्यार्थी व शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी श्री अनिल गावडे सरपंच ग्रा. प.धानोरे, सौ ज्योती गावडे उपसरपंच धानोरे सौ सुरेखा नरहरी गावडे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,श्री विठ्ठल गावडे मा. अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, श्री संग्राम गावडे ग्रामपंचायत सदस्य, श्री संतोष गावडे ग्रामपंचायत सदस्य,
श्री गणेश गावडे,श्री नरहरी गावडे, मुख्याध्यापक श्री सत्यवान लोखंडे व सर्व शिक्षकवृंद व बहुसंख्येने पालक उपस्थित होते श्री पांडुरंग आव्हाड सर यांनी सूत्रसंचालन केले तर सौ. रंजना सोनवणे यांनी आभार मानले.