टाकळीभान येथे शांतता समितीची बैठक संपन्न.

टाकळीभान येथे शांतता समितीची बैठक संपन्न.
येत्या काही दिवसात साजरे होणारे सण, उत्सव, जयंती व येथील याञा हे सर्व उत्सव शांततेत साजरे होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये यासाठी तालुका पोलिस ठाण्याचे पो.नि. दशरथ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली.
माजी सभापती नानासाहेब पवार, शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब कोकणे, जेष्ठ नेते राधाकृष्ण वाघुले, अशोकचे संचालक यशवंत रणनवरे, राजेंद्र कोकणे, भाजपचे नारायण काळे, माजी सरपंच चिञसेन रणनवरे सुभाष जगताप, प्रकाश गाडेकर, प्रमुख उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना पो.नि, चौधरी म्हणाले कि, आगामी काळात येणारे सर्व उत्सव खेळीमेळीच्या वातावरणात साजरे केले जावेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वर्तन कोणीही करु नये. लोकवर्गणी गोळा करताना दबावतंञाचा वापर करण्यात येवु नये. नियम मोडण्याचा प्रयत्न केल्यास कडक कायदेशिर कारवाई केली जाईल. एकोप्याने सण उत्सव साजरे करावेत आसेही चौधरी यावेळी म्हणाले.
गावात सुरु आसलेले अवैध धंदे पोलिस प्रशासनाने त्वरीत बंद करावेत. अनेक तरुण यामुळे व्यसनाधीन होत आहेत त्यामुळे आवैध धंदे कायम स्वरुपी बंद करावेत आशी मागणी पो,काॅ,विनोद रणनवरे यांनी या बैठकित केली. तर नारायण काळे यांनी काही दिवसांपूर्वी गावात झालेल्या लहान मुलीच्या किडनॅपिंग गुन्ह्यातील गुन्हेगाराला कोणी सपोर्ट किंवा पाठिंबा देत असेल तर त्याची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी ,
यावेळी गावात एक रुपया वर्गणी गोळा न करता. महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात केली, त्याबद्दल सुभाष जगताप जगताप यांचा सत्कार करण्यात आला ,
माजी सभापती नानासाहेब पवार, राजेंद्र कोकणे, राधाकृष्ण वाघुले, यशवंत रणनवरे, अबासाहेब रणनवरे यांनीही चर्चेत भाग घेवुन मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थ, संत सावता मिञमंडळाचे सदस्य, महादेव याञा कमेटीचे सदस्य, महात्मा ज्योतिबा फुले जयंती सोहळा समितीचे सर्व सदस्य व पञकार उपस्थित होते.
यावेळी पो.नि. यांनी येत्या काही दिवसात साजरी होणाऱ्या शंभु महादेव याञौत्सवाच्या चोख बंदोबस्तासाठी महादेव मंदिर परीसराला भेट देवुन पहाणी केली. याञौत्सवासाठी मोठा फौजफाटा तैनात करणार आसल्याचे सांगुन चौधरी म्हणाले कि, याञेला गालबोट लागणारे वर्तन कुणी केल्यास गय केली जाणार नाही. टवाळखोरांवर पोलिसांसह ड्रोन कॕमेर्याचीही नजर आसणार आसल्याने गुंडागर्दी किंवा टवाळखोरी करणारांवार थेट गुन्हे दाखल केले जातील. त्यामुळे याञा शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी याञा कमेटी सदस्यांना सहकार्य करा असा सल्ला चौधरी यांनी यावेळी दिला. याञा कमेटीच्या वतीने पो.नि. चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी याञा कमेटीचे सर्व सदस्य व पञकार उपस्थित होते.