शिक्षणात दाखविलेलं दातृत्व पिढ्यानं पिढ्या उतराई होत राहतं…काकासाहेब वाळुंजकर

शिक्षणात दाखविलेलं दातृत्व पिढ्यानं पिढ्या उतराई होत राहतं…काकासाहेब वाळुंजकर
टाकळीभान प्रतिनिधी: शिक्षणात दाखविलेलं दातृत्व पुढे पिढ्या न पिढ्या उतराई होत राहतं असं प्रतिपादन स्व. ऍड. सर्जेराव कापसे यांच्या स्मरणार्थ(जन्मदिनानिमित्त) कापसे परिवाराच्यावतीने टाकळीभान रयत हायस्कूल यास चाळीस बेंचचे वितरण कार्यक्रम प्रसंगी रयतचे उत्तर विभागीय सहाय्यक अधिकारी काकासाहेब वाळुंजकर यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ऍड. अशोकराव तांबे, रयतचे जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष राहुल पटारे, प्रा. श्रीमती सरोजिनी कापसे, ऍड. पुष्पा कापसे /गायके,विष्णुपंत खंडागळे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे ,प्रा. जयकर मगर, माजी उपसरपंच पाराजी पटारे, ऍड. राजेंद्र कापसे,मेजर प्रतापराव मगर, बाळासाहेब कापसे,ऍड.सर्जेराव घोडे, ऍड.पल्लवी भिसे, ईश्वरी कापसे, श्रेया कापसे, श्रीहर्ष कापसे,सौ मंगल घावटे, ऍड.बारस्कर,प्राचार्य बी.टी. इंगळे ,पर्यवेक्षक बनसोडे सर, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कापसे परिवाराच्या वतीने विद्यालयाला चाळीस बेंचचे वितरण करण्यात आले. यावेळी वाळूंजकर बोलताना म्हणाले की पुस्तकी ज्ञानाबरोबर जगण्याचं शिक्षण मिळणं गरजेचं असून विद्यार्थ्यांना आपल्या आई-वडिलांनी कमविलेल्या भाकरीची किंमत कळणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास ,आपलं चरित्र याला मला महत्व द्यावं. रयतचे अनेक विद्यार्थी आय ए एस ,आय पी एस होत आहेत ही अभिमानाची बाब असून रयतने गुणवत्तेला प्राधान्य दिल्याचं हे फळ आहे. कदाचित सर्वसामान्यांसाठी ही रयत शिक्षण संस्था नसती तर इतर खाजगी संस्थांमध्ये वाढत्या शैक्षणिक खर्चामध्ये विद्यार्थी शिकले असते का असा सवालही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे ही संस्था समाजसेवेच्या व्रतातून निर्माण झाली असून बहुजनांच्या शिक्षणासाठी उद्धारासाठी स्थापन केलेली संस्था आहे. या शाळेच्या आत मध्ये येताना राजकीय जोडे बाजूला असावे असे ते म्हणाले. तसेच ही सर्वांची शाळा असून सर्वांनी हिच्या प्रगती विषयी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तसेच टाकळीभान विद्यालयाचे विद्यार्थी आठवीच्या शिष्यवृत्ती स्पर्धेत राज्याच्या गुणवत्ता यादीत येऊन उत्तर विभागामध्ये शिष्यवृत्ती मध्ये द्वितीय क्रमांक या विद्यालयने मिळवल्याबद्दल विद्यालयाचे विशेष कौतुक केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बी.टी. इंगळे यांनी केले. याप्रसंगी कु. ईश्वरी कापसे हिने आपले वडील स्व. सर्जेराव कापसे यांच्या आठवणी सांगून त्यांचे जीवन चरित्राचे विविध पैलू उकलले. व त्यांना सामाजिक सेवेची अत्यंत आवड होती व राजकारणाचा विचार ही त्यांनी सामाजिक भावनेतून केला असे ती म्हणाली. यावेळी प्रा. सरोजनी कापसे यांनी कापसे कुटुंबियांची पार्श्वभूमी सांगून कापसे कुटुंबीयांना राजकारण व शिक्षणाशी जुन्या पिढीपासून संबंध असल्याचे व आवड असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी काही स्व. सर्जेराव कापसे यांनी सांगितलेल्या आठवणी सांगून स्व.जनार्दन कापसे यांनी स्व. पंतप्रधान इंदिराची गांधी यांच्यासमोर भाषण केल्याचे सांगितले.तसेच कर्मवीर आण्णा हेही कापसे वस्तीवर किसन तात्या कापसे यांकडे आले होते व त्यांनी उच्च शिक्षणासाठी तात्यांना आग्रह धरला होता गोष्टींची त्यांनी आठवण काढली. याप्रसंगी बापूसाहेब पटारे यांनी विद्यार्थ्यांसाठी बेंच उपलब्ध करून मोठे दातृत्व दाखविल्याबद्दल सर्व कापसे परिवाराचे धन्यवाद मानले. व या दातृत्वाच्या रूपाने स्व. सर्जेराव कापसे यांची स्मृती मनामध्ये कायम राहील असे ते म्हणाले.यावेळी ऍड.अशोकराव तांबे,विष्णुपंत खंडागळे,
यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले व कापसे परिवाराचे या दात्तृत्वाबद्दल आभार मानले.यावेळी विद्यालयाच्या वतीने या मोठ्या दातृत्वाबद्दल कापसे परिवाराचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी ऋषिकेश घावटे, केदारनाथ घावटे ,शरद कापसे, बाळासाहेब थोरात, ऍड. हर्षद कापसे, ऍड.प्रशांत कापसे, बबलू वाघुले, संदीप जावळे,आप्पासाहेब शिंदे आदींसह शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर काळे सर व पाचपिंड सर यांनी केले तर आभार बनकर सर यांनी मानले.