शनि शिंगणापूरात शाॉट सर्किट मुळे पाच एकर ऊस जळुन खाक लाखोंचे नुकसान.
शनि शिंगणापूरात शाॉट सर्किट मुळे पाच एकर ऊस जळुन खाक लाखोंचे नुकसान.
शनिशिंगणापूर. शनि शिंगणापूर शिवारातील गट नंबर 371मधील श्रीराम तोलाजी काळे यांची जमीन आहे त्यात उसाची लागवड केली असुन तोडणीला आलेला ऊस लाईटच्या शाॅट सर्किट झाल्यामुळे जळुन खाक झाला काळे कुटुंबांनी आग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला मात्र तरीही पाच एकर ऊस जळुन खाक झाला त्यामुळे या शेतकर्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे परिसरातील नागरिक व मुळा कारखानाही अग्नी शमन गाडी येऊन सुध्दा काहीच उपयोग झाला नाही एक झाले या शेताला लागुन असलेल्या शेतकर्यांचा ऊस वाचला तातडीने पंचनामा करून अर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे उन्हाळ्याच्या सुरवातीलाच असे नुकसान होत असताना विज वितरण कंपनीने विद्युत वाहिनी तारांची दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे अद्याप खडक उन्हाळा सुरू झाला नसला तरी शेतकरी राजांचे लाखोंचे नुकसान होत आहे याचा लोकप्रतिनिधी व वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन परिसरातील विद्युत तारांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे अन्यथा असे नुकसान होतच राहणार याला कारणीभूत आहे वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार मात्र याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे याचा विचार करून योग्यतो निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे आजुन किती शेतकर्यांचे नुकसान झाल्यावर संबंधित यंत्रणा जागी होणार आहे असा प्रश्न ऊस शेती आसलेल्या भागातील शेतकरयांना पडला आहे एक तर गाळपासाठी ऊस जाईना त्यात हे नवीनच शाॅट सकिटचे संकट त्यामुळे ऊस शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे ऊस पट्ट्यातात अशा घटना वारंवार घडत आहेत त्यामुळे हा एक चिंतेचा विषय बनला आहे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कुठलेतरी अशा घटना सत्यानने घडत आहे त या घटना कमी होण्या ऐवजी वाढत आहे अजून उन्हाचे खरे दिवस पुढे आहेत तेव्हाचा विचार न केलेलाच बरा अशी म्हणावयाची वेळ ऊस पट्ट्यातील शेतकर्यावर आली आहे साखर कारखान्याने जीथे जीथे विद्युत वाहिनीच्या तारा गेल्या आहेत तेथील ऊस गळीतास आणावा अशी मागणी जोर धरु लागली आहे