महीला दिनाचे औचित्य साधत महीला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवाद
महीला दिनाचे औचित्य साधत महीला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवाद
बेलापूर(प्रतिनिधी)ःमहाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दररोज एका नागरीकांच्या हस्ते पुष्पहार घालण्याची आगळी वेगळी परंपरा गांवकरी मंडळाने सुरु केली असुन महीला दिनानिमित्त महीलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.
बेलापूर ग्रामपंचायतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ग्रामपंचायतीच्या महिला कर्मचा-यांना पुष्पहार अर्पण करण्याचा बहुमान देत आगळ्यावेगळ्या पध्दतीने जागतिक महिला दिन साजरा केला. बेलापूर बुllग्रामपंचायतीच्या दररोज गावातील नागरीकांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्याचा उपक्रम सुरु केला आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन ग्रामपंचायतीच्या निर्मलाताई गाढे,सरस्वतीबाई बागडे,निर्मलाताई तेलोरे,लताताई गांगुर्डे या महिला कर्मचाऱ्यांना हा सन्मान देण्यात आला. महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते छञपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.हा बहुमान मिळाल्याने सदरच्या महिला कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान दिसले. ग्रामपंचायतीच्या या आभिनव उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.