
आशा सेविकांचा सन्मान करुन महिला दिन साजरा
टाकळीभान प्रतिनिधी – सामाजिक जीवनामध्ये महत्वाची जबाबदारी पाडत असलेल्या आशा सेविकेंचा हातातील घड्याळ , शाल व गुलाब पुष्प देवून उंदिरगाव ग्रामपंचयतच्या वतीने सन्मान करुन जागतीक महिला दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अभंग तर प्रमुख पाहुणे पं.स.चे भालेराव हे होते.प्रास्तविक सरपंच सुभाष बोधक यांनी केले .तर आभार ग्रामसेवक ढुमने यांनी मानले. 

सुरुवातीस राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचेचे पुजन आशा सेविकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचयत सदस्य प्रकाश ताके , आशा सेविका माया पंडीत , प्रतिमा वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.महिला ग्रामपंचायत सदस्यांना कार्यक्रमाचे आंमत्रण देऊन सुध्दा त्यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

Rate this post