राजकिय
शेतकऱ्याचा मुलगा असल्याने ग्रामीण भागातील प्रश्नांची मला जाणीव—-आमदार लहू कानडे…

टाकळीभान जनतेचे माझ्यावर भरभरून प्रेम … येथील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही...
-शेतकऱ्याचा मुलगा असल्याने ग्रामीण भागातील प्रश्नांची मला जाणीव….आमदार लहू कानडे…
- टाकळीभान जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले असून टाकळीभानच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू पडणार देणार नाही,शेतकऱ्याचा मुलगा असल्याने ग्रामीण भागातील प्रश्नांची मला चांगली जाणीव असून ते प्रश्न सोडविण्यासाठी माझी आमदारकी पणाला लावणार असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी टाकळीभान येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी केले.
- टाकळीभान पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या 24 तास विजेसाठी लींक लाईन फिडर च्या 17 लक्ष रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन आमदार लहू कानडे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना ते म्हणाले की तालुक्यामध्ये रस्ते, पाणी ,वीज, शिक्षण, आरोग्य या सर्वच क्षेत्रांमध्ये लक्ष घालून यासंदर्भातची मोठ्या प्रमाणात विकास कामे तालुक्यात सुरू असून आपल्या आशीर्वादामुळे आपण तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून मला निवडले त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न सुरु आहे. तालुक्यामध्ये काम करत असताना राजकारण गट-तट बाजूला ठेवून निपक्षपातीपणे, निरपेक्ष भावनेने काम करत असून सर्वांना न्याय देण्याचा, सर्वांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. टाकळीभान गावांमध्ये माझ्या स्थानिक निधी अंतर्गत विविध विकास कामांसाठी निधी दिला असून यापुढेही विविध कामांसाठी सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले. महादेव मंदिर ओढ्यावरील पूल, टाकळीभान येथे बेलपिंपळगाव रस्ता, टाकळीभान घोगरगाव रस्ता, जुना कमलपूर रस्ता, टाकळीभान कारेगाव रस्ता, गणेश खिंड पढेगाव रस्ता, आदींची कामे सुरू असून काही कामे झाली आहेत. त्याचप्रमाणे बाबळेश्वर फाटा ते नेवासा फाटा हा पन्नास वर्षापासून रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला असून, यामुळे तालुक्याच्या दळणवळण यामध्ये निश्चितच फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. तसेच टाकळीभान च्या पिण्याच्या पाण्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी 24 तास विज उपलब्ध व्हावी म्हणून लिंक लाईन फिडर साठी 17 लक्ष रुपये खर्च करून या कामाचे उद्घाटन ही पार पडले आहे. टाकळीभान साठी भरीव निधी दिला असून या गावाने भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे या गावासाठी काही कमी पडू देणार नसल्याचे ते म्हणाले. मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी आमदार लहू कानडे यांचा विकास कामांबाबत कोणी हात धरणार नसून, आत्तापर्यंत सर्वात जास्त निधी आणणारे व विकास काम करणारे आमदार म्हणून आमदार लहू कानडे यांची सर्वत्र ओळख झाली आहे. त्यांच्या शासकीय कामाच्या अनुभवाचा फायदा निश्चित तालुक्याला होणार असल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी प्रास्ताविक भाषणात राजेंद्र कोकणे यांनी आमदार लहू कानडे यांच्या सारखा कार्यसम्राट आमदार तालुक्याला लाभला असून आपल्या तालुक्याचे भाग्य आहे.अतिशय हुशार व अभ्यासू आमदार म्हणून लहू कानडे यांची ओळख असून त्यांच्या दूरदृष्टीने ते अतिशय नियोजन बद्ध, रचनात्मक काम ते या तालुक्यात करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच टाकळीभानच्या पिण्याच्या पाण्यासाठी 24 तास विज मिळण्याची अडचण होती, ती आपण सोडवून गावातील लेकी, बाळी ,महिला ,भगिनी यांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे पुण्याचे काम केले असून यामुळे गावासाठी पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा होऊन या सर्व माता भगिनी चे आशीर्वाद आपल्याला लाभतील असे ते म्हणाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच मंजाबापू थोरात होते. थोरात बोलताना म्हणाले की श्रीरामपूर तालुक्याने आमदार लहू कानडे यांना कार्यसम्राट आमदार म्हणून पदवी बहाल केली आहे. आज टाकळीभान ग्रामपंचायतचा पिण्याच्या पाण्यासाठी 24 तास विजे साठी नवीन लिंक लाईन फिडर साठी 17 लक्ष रुपये निधी देऊन महत्त्वाचा प्रश्न सोडविला आहे टाकळीभान आपल्याला विसरणार नाही अशा शब्दात त्यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत भवार यांनी केले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी (टेल टँक येथे)(Tel tyank )माजी सभापती नानासाहेब पवार, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, अशोक नाना कानडे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, Ad. सर्जेराव कापसे, उपसरपंच कान्हा खंडागळे, विष्णुपंत खंडागळे, माजी सरपंच भाऊसाहेब मगर, सेवा संस्थेचे माजी चेअरमन राहुल पटारे, उपाध्यक्ष आबासाहेब रणनवरे, प्रा. विजय बोर्डे,रावसाहेब मगर,पोपटराव पटारे, महेंद्र संत, मोहन रणनवरे, बंडोपंत बोडखे, , मुकुंद हापसे,प्रकाश दाभाडे, भाऊसाहेब कोकणे ,
- रोहिदास पटारे, गजानन कोकणे, विलास सपकाळ, गणेश कोकणे ,पांडुरंग मगर, बापू शिंदे, आदींसह गावातील मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,