दिव्यांग व्यक्तिच्या सर्वांगीण विकासासाठी कासा मनूष्यबळ विकास संस्था कायम पाठीशी.

दिव्यांग व्यक्तिच्या सर्वांगीण विकासासाठी कासा मनूष्यबळ विकास संस्था कायम पाठीशी.
ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिच्या सर्वांगीण विकासासाठी कासा मनूष्यबळ विकास संस्था सातत्यपूर्ण सबलीकरण कार्यक्रम राबवत आहे.खोकर गांवातील दिव्यांगाना प्राधान्यक्रम देउन दिव्यांग सामाजिक पूनर्वसन करण्यास हातभार लावला आहे.खोकर ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री योजनेअंतर्गत दिव्यांगाकरिता विशेष घरकूल योजना राबवावी असे प्रतिपादन अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड यांनी दिव्यांग सबलीकरण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी केले.
कासा मनुष्यबळ विकास संस्था अहमदनगर यांच्या वतीने आसान दिव्यांग संघटना खोकर शाखेतील दहा दिव्यांग व्यक्तीला कासा संस्थाचे प्रकल्प अधिकारी श्री.सुनिल गायकवाड व अपंग सामाजिक विकास संस्थाचे चेअरमन संजय साळवे यांच्या विशेष प्रयत्नांतून *दिव्यांग सबलीकरण कार्यक्रमा* अंतर्गत दहा दिव्यांग व्यक्तीच्या खात्यांवर रु.६०००/- (सहा हजार ) जमा करण्यात आले व ५५० रू.किंमतीचे सेफ्टी वाॅशिंग किट अपंग सामाजिक विकास संस्था चे चेअरमन संजय साळवे,सचिव वर्षा गायकवाड,आसान दिव्यांग संघटना राज्याध्यक्ष मूश्ताकभाई तांबोळी, महिला राज्याध्यक्ष सौ.स्नेहा कूलकर्णी,जिल्हाध्यक्ष विश्वास काळे,खोकर ग्रामपंचायत सरपंच सौ.आशा चक्रनारायण,सदस्य राजू चक्रनारायण,सामाजिक कार्यकर्त्या कू.सहर्षा साळवे यांच्या शूभहस्ते वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सरपंच सौ.आशा चक्रनारायण यांनी भूषविले.
खोकर ग्रामपंचायतीच्या वतीने लवकरच खोकर गांवात दिव्यांग व्यक्तिकरिता प्रधानमंत्री योजने मार्फत घरकूल योजनेची अंमलबजावणी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल.अशी ग्वाही ग्रामपंचायतीचे मूख्य प्रवर्तक राजू चक्रनारायण यांनी जाहीरपणे दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खोकर शाखेचे अध्यक्ष विकास साळवे, उपाध्यक्ष दत्तात्रय चव्हाण,खजिनदार कादिरभाई शेख,सचिव गंगाधर सोमवंशी,गणेश विप्रदास,इरफान पठाण इ.नी विशेष परिश्रम घेतले.