अपघात

स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या २३ वर्षीय युवकाची आत्महत्या                 

स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या २३ वर्षीय युवकाची आत्महत्या     

 

गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव परिसरात हळहळ 

 

स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या २३ वर्षीय युवकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड शहरात घडली आहे. सदरील युवक हा गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव येथील असून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. सदरील घटनेने सुशी वडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

      

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील सुशी येथील युवक आकाश बंडू पौळ (वय २३) वर्ष असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

त्याचे वडील गावाकडे शेती करतात. काही दिवसांपासून हा तरुण महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करुन बीड शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता. दरम्यान गुरुवार दि.२० जुलै रोजी सकाळच्या सुमारास त्याने बीड शहरातील भाड्याने राहत असलेल्या रुममध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव परिसरात खळबळ उडाली आहे. 

 

त्याने आत्महत्या का केली असावी याची माहिती मात्र उशिरापर्यंत समजू शकली नाही. घटनास्थळाचा पोलीसांनी पंचनामा करून, त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी सुशी येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे