नाशिक *बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी निवड*

नाशिक *बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी निवड*
*नाशिकरोड: येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बिटको महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणेच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाचे सदस्यपदी पाच वर्षांसाठी निवड विद्यापीठामार्फत नुकतीच करण्यात आली आहे.*
*प्रा डॉ सुदेश घोडेराव हे गेली 31 वर्षे रसायनशास्त्र हा विषय वरिष्ठ महाविद्यालयात शिकवत आहेत. असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टिचर्सच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे ते सदस्य आहेत. तसेच त्यांना सामाजिक कार्याची देखील आवड असून राष्ट्रीय स्तरावरील फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे ते जनरल सेक्रेटरी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समन्वय विभागाचे राज्य कार्यवाह आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव प्रा डॉ राम कुलकर्णी, बिटको महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ मंजुषा कुलकर्णी, उप प्राचार्य डॉ अनिलकुमार पठारे, डॉ आकाश ठाकूर, विज्ञान शाखा समन्वयक डॉ कल्याणराव टकले, असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टिचर्सचे अध्यक्ष डॉ ब्रिजेश पारे, सचिव डॉ डी व्ही प्रभू आणि सामाजिक क्षेत्रातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यकार्याध्यक्ष माधव बावगे, राज्यअध्यक्ष अविनाश पाटील, फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ नरेंद्र नायक आणि ईतर पदाधिकारी यांचे सह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.*
*नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध वर्गांचे अभ्यासक्रम निर्माण करणे आणि विद्यार्थी मूल्यमापन प्रक्रियेबाबत आखणी करण्याचे आव्हानात्मक काम अभ्यासमंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ बापूसाहेब जगदाळे आणि ईतर सदस्य यांचे सहकार्याने करण्यात येणार आहे असे प्रा डॉ सुदेश घोडेराव यांनी सांगितले आहे*