
केंद्रीय कायदा मंत्री सत्यपाल सिंह बघेल शनी दरबारी.
शनी शिंगणापूर केंद्रीय कायदा व न्याय मंत्री सत्यपाल सिंह बघेल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास शिंगणापूरात दाखल झाले त्यांनी शनी चौधरयावर जाऊन शनी महाराजांचे दर्शन घेतले तसेच उदाशी महाराज मठात अभिषेक केला याप्रसंगी शनैशवर देवस्थानाच्या वतीने उप अध्यक्ष विकास बानकर उपस्थित होते मंत्री बघेल हे शनी देवाला खुप मानतात कुठे ना कुठे शनी देवाचे दर्शन घेतात सत्यपाल सिंह बघेल हे या पूर्वीही शनिशिंगणापूरला आले होते देवस्थानने केलेली प्रगती पाहुन मनाला समाधान वाटले येथील माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पानसनाला सुशोभिकरण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली येथील प्रकल्प पाहुन अतिशय उत्तम काम होत आसुन त्यामुळे शिंगणापूरला वैभव प्राप्त होणार आहे माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे कौतुक केले शनी देव हे न्यायची देवता आहे येथील परिसर पाहुन मनाला समाधान मिळते आपण या पुढे ही शनी देवाच्या कृपेने दर्शना येऊ देवस्थानच्या अतिथीगृहात देवस्थानचे उपाध्यक्ष विकास बानकर शनी प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला यावेळी देवस्थानचे विश्वस्त पोपटराव शेटे आदी मान्यवर उपस्थित होते शनी शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी चोक बंदोबस्त ठेवला