अपहरण करून एक लाख बारा हजार रुपये लुटणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक व तीन दिवस पोलीस कस्टडी*

अपहरण करून एक लाख बारा हजार रुपये लुटणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक व तीन दिवस पोलीस कस्टडी*
राहुरी पोलीस ठाणे गुरनं 447/2024 भादवि कलम 327,363, 324, 323, 504,506 प्रमाणे फिर्यादी साईनाथ भाऊसाहेब भुजबळ यांनी राहुरी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली असून
आरोपी नामे १ सचिन धोंडीभाऊ खेमनर राहणार साकुर तालुका संगमनेर व त्याचे इतर तीन साथीदार यांनी फिर्यादीस गंगापूर गावाच्या शिवारात पेपर मिल जवळ बोलावून घेऊन बळजबरीने त्यास गाडीत बसून त्यास वडनेर गावाचे शिवारात रानमाळ येथे घेऊन जाऊन त्यास केबलने व लाकडी काठीने मारहाण करून इच्छापूर्वक दुखापत केली असून त्याच्या खिशातील एक लाख बारा हजार पाचशे रुपये बळजबरीने काढून घेतली आहेत वैगेर मजकुराच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. यातील आरोपी १ ) सचिन धोंडीभाऊ खेमनर वय 28 राहणार साकुर तालुका संगमनेर यास दिनांक 14/ 4/ 2024 रोजी 20/ 30 वाजता अटक करण्यात आली असून मा. हुजूर कोर्टाने 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे. नमूद गुन्ह्याचा तपास सपोनी पिंगळे हे करीत आहेत . सदर गुन्ह्यातील फरार आरोपीचा अधिक शोध घेत आहोत
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर , डॉ.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वात सपोनि पिंगळे पोहेकॉ आवारे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल जायभाय औटी,पोना कोकाटे,पोना सानप, सफौ औटी,पोशि रवी पवार यांनी केली आहे
पुढील तपास सपोनि पिंगळे हे करत आहे.