आळंदी बंद शांततेत संपन्न विश्वस्तांच्या आक्षेपार्य वक्तव्याने मात्र ग्रामस्थ संतप्त*
*आळंदी बंद शांततेत संपन्न विश्वस्तांच्या आक्षेपार्य वक्तव्याने मात्र ग्रामस्थ संतप्त*
आळंदी/श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त श्री योगेश देसाई यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत यापूर्वीच पुरवण्याची असलेल्या आळंदीबंद मध्ये ग्रामस्थांमध्ये रोष दिसून आला. दिनांक पाच 12 2013 रोजी गुरु हैबत बाबा यांच्या पायरी पूजनाने श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याला प्रारंभ झाला कार्तिक वारी मोठ्या प्रमाणात भरणार आहे मात्र ऐन कार्तिकीच्या वारीच्या पहिल्या दिवशी आळंदीकरांनी बंद पुकारण्याची हाक दिली होती. त्यास शंभर टक्के पाठिंबा मिळाला आहे. मात्र प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी स्थानिक ग्रामस्थ विश्वस्त पदी नाही त्यासाठी आळंदी बंद ची घोषणा पुकारल्यानंतर आळंदीकर यांचे योगदान काय देवस्थानला काय सहकार्य करतात असा आक्षेपार्य वक्तव्य एका पप्रसिद्धी माध्यमातून दिले. त्यामुळे शांतता मुळे होणाऱ्या बंदला उग्र स्वरूप प्राप्त झाले आणि ग्रामस्थांचा रोष अनावर झाला हे वक्तव्य झाल्या नंतर ग्रामस्थांच्या भावना संतप्त असल्याचे दिसून आले. निघालेला निषेध मोर्चा महादोरामध्ये समारोपासाठी थांबला माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे अध्यक्षतेखाली सदर निषेध सभा पार पडली या सभेमध्ये माजी नगरसेवक डी डी भोसले. माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे. माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर. माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर.माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले. माजी उपनगराध्यक्ष वासुदेव घुंडरे. माजी उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया. माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले.माजी नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे.माजी नगरसेवक रमेश गोगावले.माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे. उत्सव कमिटी अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे. माजी सभापती नंदकुमार कुऱ्हाडे माजी सभापती श्रीधर कुऱ्हाडे. भाजपा अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष संजय घुंडरे. साहेबराव कुऱ्हाडे. माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर.माजी नगरसेवक दिनेश घुले.आळंदी सर्व माजी नगरसेवक. माजी नगराध्यक्ष.ह भ प निलेश बाबा लोंढे.ह भ प गोविंद महाराज गोरे. ह भ प पुरुषोत्तम पाटील. ह भ प माऊली महाराज हर्फळे. ह भ प संगीताचार्य कल्याणजी गायकवाड. वारकरी विद्यार्थी वर्ग वारकरी संप्रदायातील प्रवचनकार कीर्तनकार महिला युवक आबा नृत्य समस्त गावकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते