चिमुकल्या च्या नाकावर राग का वाढतोय? पालकांना भेडसावतो प्रश्न

चिमुकल्या च्या नाकावर राग का वाढतोय? पालकांना भेडसावतो प्रश्न
लहान मुलं जेवढी खळखळून हसतात तेवढाच त्यांना राग ही येतो. मुलांना राग येण्यामागे काही कारणं असू शकतात. लहान-लहान गोष्टीवरुन राग येणे, आपला हट्ट पूर्ण न केल्यास राग येणे, होमवर्क करायचा नाही म्हणून राग येणे अशी अगणित कारण आहेत ज्यामुळे मुलांना राग येऊ शकतो.मात्र, ही समस्या कशी सोडवायची याच चिंतेत अनेकजण असतात. अनेक कारणांमुळे त्यांना राग येत असतो. तसेच हाच राग ते अनेक माध्यमातून व्यक्त करताना दिसतात. मात्र, याचा प्रत्येकाला त्रास होत असून रागावर नियंत्रण कसे मिळवायचे हेच अनेकांना माहिती नसते.
म्हणून चिमुकले दिवसेंदिवस हट्टी बनत चालले आहेत. समाज माध्यम दिवसेंदिवस वाढत चाललेली विभक्त कुटुंबपद्धती भावना व्यक्त करण्याचा अभाव यातून लहान मुलं चिटकी होत आहेत .खरं तर ही बाब पालकांसाठी धोक्याची आहे हा प्रकार पालकांनी गंभीरपणे घ्यायला हवा या प्रकाराला वेळीच आवर घालण्यासाठी पालकांनी मुलांची काळजी घेतली पाहिजे त्यांच्यापासून समाज माध्यमावर दूर केली पाहिजे या धावपळीच्या युगात संयुक्त कुटुंब पद्धतीचा अभाव आहे अलीकडे विभक्त कुटुंब पद्धतीचे प्रमाण वाढले आहे या परिस्थितीत मुलांना समजून घेणारी आणि सांगणार कोणी राहत नाही आज संयुक्त कुटुंब पद्धतीचा मोठा अभाव दिवसेंदिवस दिसून येतो विभक्त कुटुंब पद्धती वाढली आहे पालक कामात असल्याने अनेक वेळा मुले एकाकी राहतात त्यामुळे त्याचाही परिणाम मुलावर होत असल्याचे एका संशोधनातून आता सिद्ध झाला आहे
मुलांमध्ये राग वाढण्याची कारणे मोबाईलचा अतिवापर अलीकडे घरात एकुलता एक मुलगा असल्याने त्याचे लाड पुरले जातात आणि यातूनच मुलाकडे मोबाईल दिला जातो मुलं मोबाईल मुळे काल्पनिक जगात जगायला लागतात
आई-वडील व्यस्त
आई वडील कामात व्यस्त असल्याने मुलांना समजावून सांगण्यासाठी घरी कोणीच नसतं या मुळे मुलं वाटेल तशी वागतात यातून मुलांना समजून न घेतल्याने मुलांमध्ये न्यूनगंड वाढत असल्याचे चित्र आज समाजामध्ये दिसत आहे
आम्ही मुलांना कुठल्याच गोष्टीची कमतरता करत नाहीत यानंतरही मुलं हट्टी होत आहेत त्यांच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न केला तर ती अधिकच चिडचिड करतात त्यांना हवी ती गोष्ट द्यावी लागते
मुलांकडे मोबाईल दिला नाही तर मुलगा जेवतच नाही अशा स्थितीत अखेरचा पर्याय म्हणून मोबाईल दिला जातो मोबाईल मधील कार्टून आणि इतर काही आक्रमक खेळ पाहून मुलं जोरजोराने ओरडतात
पिता पालक
मोबाईल व नियंत्रण हवे
मुलाचा आहार सुधारणा अपेक्षित आहे मुलांनी व्यायामावर लक्ष केंद्रित करण्यावर भर देत प्राधान्य क्रमाने त्याच्याकडून मोबाईल काढून घेतला पाहिजे टीव्हीवरील कार्टून पूर्णतः बंद केले पाहिजे या सर्व वेगळीच नियंत्रण ठेवले तर मुलं शांत आणि समजदार होतील आपण बालपणी च मुलं जेवण करत नाहीत म्हणून जेवताना मोबाईल देतो इतर वेळी जर मोबाईल दिला नाही तर मुलं हट्ट करतात आणि यातूनच त्यांना राग यायला सुरुवात होते….
डॉ. श्रृती पानसे
मेंदू आणि शिक्षण अभ्यासक