टाकळीभान येथे विकसित संकल्प यात्रेचे ग्रामपंचायत व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत…

टाकळीभान येथे विकसित संकल्प यात्रेचे ग्रामपंचायत व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत…
टाकळीभान प्रतिनिधी: देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या संकल्पनेतून भारत विकसित संकल्प रथयात्रेचे स्वागत ग्रामपंचायतच्या वतीने व भारतीय जनता पार्टी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. शासनाच्या विविध योजना गाव गाव पोहोचण्यासाठी व त्याची जनजागृती करण्यासाठी या विकसित संकल्प रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंचायत राज व ग्रामविकास जिल्हाप्रमुख नारायण काळे, ग्रामस्थांच्या वतीने प्रा. जयकर मगर यांनी या विकसित रथयात्रेचे स्वागत केले. शासनाच्या असणाऱ्या विविध योजना, शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना, बांधकाम कामगारांसाठी विविध योजना, मध्यान भोजन, उज्वला गॅस योजना, शेतकरी, युवा वर्ग, महिला, ज्येष्ठ व्यक्ती, सर्वांसाठीच्या शासनाच्या योजना ची माहिती स्क्रीन द्वारे यावेळी नागरिकांना देण्यात आली. या रथयात्रेसोबत आलेले अण्णासाहेब थोरात व कैलास शिंदे यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या योजना टाकळीभान गावांमध्ये यशस्वीपणे राबविणारे भाजपचे कार्यकर्ते नारायण काळे यांच्या नियोजनाखाली श्रीरामपूर तालुक्यामध्ये या भारत विकसित संकल्प यात्रेचे नियोजन असून पंचायत राज व ग्रामविकास जिल्हाप्रमुख पदी ही त्यांची निवड करण्यात आली आहे.
या रथयात्रेच्या स्वागत प्रसंगी माजी सभापती नानासाहेब पवार ,सरपंच अर्चनाताई रणनवरे, अशोकचे संचालक यशवंत रणनवरे,दत्तात्रय नाईक, शिवाजीराव धुमाळ, मुकुंद हापसे , श्रीकृष्ण वेताळ प्रा. जयकर मगर ,सुनील बोडखे, संजय पवार, ग्रामसेवक रामदास जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. राम बोरुडे, मुख्याध्यापक अनिल कडू, क्षीरसागर बी.आर., सागर काळे सर ,आदिनाथ पाचपिंड सर ,भारत गुंजाळ,बापूसाहेब साळवे,माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांनीही या रथयात्रेत सहभाग घेतला. यावेळी सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांना विकास योजनेच्या दिनदर्शिका वाटण्यात आल्या.