पोलीस स्टेशनला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न खेड तालुक्याच्या कमिटीचे निवेदन*

**आळंदी पोलीस स्टेशनला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न खेड तालुक्याच्या कमिटीचे निवेदन*
*पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी, पोलिसांचे निलंबन थांबवणे तसेच पत्रकार अटक प्रकरणी नोंदवला निषेध*
प्रतिनिधी आरिफ भाई शेख
महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या संताप व्यक्त करण्यासाठी त्यांच्यावर शाई फेकण्यात आली याप्रकरणी पत्रकार गोविंद वाकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, तसेच बंदोबस्त साठी असलेले पोलीस यांनाही निलंबित करण्यात आलेले आहे,त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न खेड तालुका पत्रकार संघाच्या मिटींगचे आयोजन आळंदी देवाची येथे करण्यात आले होते, या पत्रकार संघाच्या मीटिंगमध्ये पत्रकार गोविंद वाकडे यांच्यावर झालेल्या अटक कारवाईचा निषेध नोंदवण्यात आला,तसेच त्याबाबत ज्या ज्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे,ती त्वरित मागे घेण्यात यावी,पोलिसांचे निलंबन करू नये,अशी मागणी याबाबतचे पत्र खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आळंदी पोलीस स्टेशन येथे देण्यात आलेले आहे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमात बोलताना डॉ,बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, यांचे बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, त्याचा निषेध विविध स्तरातून नोंदवला जात आहे, आणि याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर एका कार्यक्रमात शाई फेकण्यात आली होती, याप्रकरणी पोलिसांनी धरपकड करत आयबीएन लोकमत वरिष्ठ पत्रकार गोविंद वाकडे यांच्यावर आज गुन्हा दाखल केला आहे, तसेच संबंधित ठिकाणी उपस्थित पोलीस यांच्यावर राज्य सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे त्याचा विरोध करत आणि पत्रकारांच्या वर झालेल्या कारवाईला निषेध नोंदवत आळंदी पोलीस स्टेशनला खेड तालुका मराठी पत्रकार संघाने भेट दिली, आणि निषेध तसेच पोलिस निलंबन कारवाई थांबवण्यात यावी असे निवेदन पत्र दीले आहे ,या पत्रावर खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सम्राट राऊत, कल्पेश भाई, आशिष ढगे,खेड तालुका पत्रकार संघाचे सहसचिव आरिफ भाई शेख खेड तालुका पत्रकार संघाच्या सर्व पत्रकार कल्पेश भाई सुनील बटवाल मनोहर गोरगले , अनिकेत गोरे या सर्वांच्या सह्या या पत्रावर आहेत आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने क्राईम वरिष्ठ निरीक्षक रमेश पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार केला याबाबत त्याबाबत बोलताना सम्राट राऊत यांनी पोलीस निलंबनाची कारवाई थांबवावी पोलिसांचा या दोष नाही तसेच पत्रकारांवर दाखल केलेला गुन्हा चुकीच्या पद्धतीने नोंदवला आहे, असे मनोगत व्यक्त केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न खेड तालुक्याचे सहसचिव आरीफ भाई शेख आळंदी यांनी दिली आहे, यात लहू लांडे नितीन सहित अर्चना हजारे बापूसाहेब चंद्रकांत भालेराव विलास दाभाडे या पत्रकारांच्या सह्या आहेत