टाकळीभान येथील पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरला.

टाकळीभान येथील पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरला.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान टेलटँकजवळ असलेला पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
टाकळीभानसह परिसरातील गावांना वरदान ठरलेला टेलटँक पुर्णक्षमतेने भरल्याने टेलटँकच्या सांडव्यातून पाणी पाझर तलावात सोडण्यात आल्यावर आज पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरला आहे. पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओढ्यातून पाणी वाहू लागले असून या ओढ्यावर असलेले सर्व बंधारे आता तुडूंभ भरले जावून ओढा
परिसरात असलेल्या शेतकर्यांच्या विहिरींंच्या पाणी
पातळीत वाढ होणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नन्नवरे. उपविभागीय अभियंता संजय कल्हापुरे, शाखाधिकारी राम निकम, सिंचन शाखा कारेगाव महेश शेळके, बेलपिंपळगाव सिंचन शाखा बाळासाहेब जपे, मोजनीदार सिंचन शाखा बेलपिंपळगाव बाळासाहेब कोकणे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
या सर्व अधिकारी वर्गाचा ” टाकळीभान ग्रामपंचायत ” व ” ताई प्रतिष्ठाण ” च्या वतीने सत्कार करण्यात येणार असल्याचे उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी सांगितले.