यात्रेला येणारा प्रत्येक भाविक माझ्यासाठी महत्वाचा —- प्रशांत पाटील

यात्रेला येणारा प्रत्येक भाविक माझ्यासाठी महत्वाचा —- तहसीलदार प्रशांत पाटील
हारेगाव मतमाउली यात्रेला येणारा प्रत्येक माझ्यासाठी महत्वाचा असून त्यांची काळजी घेणे ये आपले कर्तव्य असल्याचे तहसिलदार प्रशांत पाटील यांनी मतमाउली यात्रा पूर्वतयारीची पहाणी केली त्या वेळी सांगीतले.
शनिवारी १० सप्टेंबर रोजी मतमाउली यात्रा संपन्न होत असुन त्या निमित्तानं चर्चचे धर्मगुरु ,आ.लहु कानडे व प्रशासकिय अधिकारी , हरेगाव – उंदिरगाव ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक झाली.बैठकीमध्ये यात्रेच्या तयारी बाबत चर्चा करण्यात आली .
दुकान व रहाट पाळणे व्यवस्था बघत असतांना तहसिलदार पाटील यांनी रहाट पाळणा चालकांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी रहाट पाळणा परवाना , सुरक्षा बाबतच्या उपाययोजना यांची माहीती घेतली.भावीकांची काळजी घेण्याची सक्त ताकीद त्यांनी दिली.बैठकीच्या सुरुवातीस आ.कानडे यांच्या प्रशासकिय सेवेच्या अनुभवाची प्रचीती अधिकार्यांना सुचना करतांना दिसली.त्यांनी मौलिक सुचना या वेळी केल्या.गेल्याचाळीस वर्षात आमदारांनी प्रथमच प्रशासकिय बैठक घेत अधिकार्यांना कागद व पेन घेवून सुचना लिहीण्यास सांगीतले .
यावेळी प्रमुख धर्मगुरु फा.सुरेश साठे , फा.डाँमनिक , फा.सचिन , फा.रिर्चर्ड , पो.नि.भोसले ,अशोक कानडे , अशोकचे संचालक विरेश गलांडे , दुध संघाचे संचालक राजेंद्र पाऊलबुध्दे , संरपंच सुभाष बोधक , उपसरपंच रमेश गायके , दिलीप गलांडे ,अमोल नाईक , प्रकाश ताके , दिलीप त्रिभूवन , रमेश भालेराव , सुनिल शिनगारे , ज्यो दिवेसर , फिलीप पंडीत , डि एस.गायकवाड , बी.सी .मंडलीक , मंडलअधिकारी वायखिंडे , तलाठी हेंमत डहाळे , ग्रामविस्तार अधिकारी वावीकर , सचिन आव्हाड , सुनिल आव्हाड आदी ऊपस्थित होते.