महामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वत्र साजरी मान्यवराकडून पुष्पांजली
महामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वत्र साजरी मान्यवराकडून पुष्पांजली
येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळा आणि प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.बेलापूर सेवा सोसायटीत चेअरमन सुधीर नवले यांच्या हस्ते डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच महेंद्र साळवी, जि. प. सदस्य शरद नवले यांनी प्रतिमा पुजन केले.
विविध ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमात सरपंच महेंद्र साळवी, बाजार समिती संचालक सुधीर नवले, जनता आघाडी प्रमुख रविंद्र खटोड , माजी सरपंच भरत साळुंके,माजी पं .स.सदस्य ,जि. प. सदस्य शरद नवले,अजय डाकले, अय्याज सय्यद, विलास मेहेत्रे,शिवाजी पा.वाबळे,चंद्रकांत नाईक, मुश्ताक शेख,साहेबराव वाबळे, दत्ता कु-हे ,अनिल पवार, अशोक गवते,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा, प्रकाश कु-हे,विजय शेलार,बंटी शेलार, भाऊसाहेब तेलोरे ,सागर खरात ,विशाल तेलोरे , पोपट खरात विजय अमोलीक नितीन खरात नितीन तेलोरे संजय शेलार रोहन शेलार रोहीत शेलार पोलीस पाटील अशोक प्रधान, ज्ञानदेव पा. वाबळे,जाकीर शेख,भाऊसाहेब तेलोरे,भास्करराव बंगाळ,तेली सामाजाचे जिल्हाध्यक्ष लहानुभाऊ नागले,राजेंद्र ओहोळ, भैय्या शेख, शफीक आतार, प्रभाकर ढवळे, विजय शेलार बंटी शेलार इस्माईल शेख,पत्रकार प्रा. ज्ञानेश गवले, देविदास देसाई, विष्णुपंत डावरे,दिलीप दायमा, किशोर कदम
सुरेश अमोलिक, ग्रा. पं. सदस्य रमेश अमोलिक, सचिन अमोलिक, रावसाहेब अमोलिक ,राजु खरात आदी सहभागी झाले होते.कोरोनाचे निर्बंध उठल्याने यंदा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, सवाद्य जल्लोष करीत, घोषणा देऊन बाबासाहेबांचा जयघोष केला.या वेळी महामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेकडरांच्या जयंती निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरण व गरजु मुलांना वह्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले तालुक्याचे माजी आ. भानुदास मुरकुटे, आ. लहू कानडे यांनी दुपारी भेट देऊन येथे डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.यावेळी पोहेकॉ अतुल लोटके, गणेश भिंगारदे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.