श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात पारंपारिक पद्धतीने होळी साजरी*

*श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात पारंपारिक पद्धतीने होळी साजरी*
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये तीर्थक्षेत्र आळंदी येथील माऊलींच्या दरबारात पारंपारिक पद्धतीने होळीचा सण साजरा केला गेला या होळीचे परंपरा यावर्षीही लपली गेली आळंदीतील या होळीच्या सणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे ग्रामस्थ गावकरी हे त्यांच्या घरातून होळीसाठी लागणाऱ्या शेणाची गौरी घेऊन माऊलींचे मंदिरात येतात आणि माऊलींच्या दरबारात पेटणार्या होळीला, त्या देत एकच मोठी होळी या ठिकाणी साजरी केली जाते हे परंपरा अखंडितपणे चालू आहे ग्रामस्थांच्या मोठ्या प्रमाणात गवऱ्या आळंदीच्या माऊली मंदिरात एकत्र करून विधिवत पूजावत करून होलिका मातेला प्रसन्न करण्यात आली माऊलींच्या नावाचा जयघोष करत भाविक भक्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत शास्त्रीय पद्धतीने पूजा हवन करून होळी पेटवण्यात आली श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विश्वस्त व्यवस्थापक वारकरी बांधव मालक चोपदार ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते