शनिवारी मध्यरात्री घोगरगाव येथे चोरांचा धुमाकूळ… मंदिरांमध्ये केल्या चोऱ्या…

शनिवारी मध्यरात्री घोगरगाव येथे चोरांचा धुमाकूळ… मंदिरांमध्ये केल्या चोऱ्या…
टाकळीभान: शनिवार दि.४ मार्च रोजी मध्यरात्री घोगरगाव येथे चोरांचा धुमाकूळ झाला. यामध्ये चोरट्यांनी चार दिवसापूर्वी प्राणप्रतिष्ठा झालेली साईबाबा मंदिर कळस चोरीचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला. चोरट्यांनी जुने घोगरगाव गावठाण येथील महादेव मंदिरातील पिंडीवर पाणी पडणारा तांब्याचा कलश, मंदिरातील घंटा चोरली तसेच जुने गावठाण घोगरगाव मारुती मंदिरातील घंटी, समई चोरली तसेच जुन्या घोगरगावातीलच लक्ष्मी माता मंदिर (भोन्याई मंदिर) येथील मंदिरासमोरची घंटी चोरून नेली.जुन्या घोगरगाव मध्ये हा चोरांचा सुळसुळाट झाला असून चोऱ्यांच्या सत्रात वाढ झाल्याने मंदिरे ,सार्वजनिक ठिकाणे धोक्यात आली आहेत, तर नागरिक या चोऱ्यांमुळे धास्तावलेले आहेत. व नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून, पोलीस यंत्रणेने सतर्क राहून यावर उपाययोजना करून आळा घालावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.