धार्मिक

देश अनेक जाती,धर्माचा, भाषेचा,हिंदूंचा असो की मुस्लिमांचा वा अन्य घटकांचा असो त्याचा मूळ विचार सामंजस्य निर्माण करणारी भूमिका घेणारा वारकरी संमेलनात शरद पवार यांचे प्रतिपादन*

*देश अनेक जाती,धर्माचा, भाषेचा,हिंदूंचा असो की मुस्लिमांचा वा अन्य घटकांचा असो त्याचा मूळ विचार सामंजस्य निर्माण करणारी भूमिका घेणारा वारकरी संमेलनात शरद पवार यांचे प्रतिपादन*

 

 

 

चऱ्होली येथील मुक्ताई लॉन्स येथे भागवत वारकरी संमेलन आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय वारकरी संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय माजी कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, वारकरी संप्रदायाच्या या व्यासपीठावरून अनेकांनी विचार मांडलेले आपण ऐकले, त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली.हा देश अनेक जाती, धर्माचा, भाषेचा,असला तरी.त्याचा मूळ विचार जो आहे तो विचार हिंदूचा असो की मुस्लिमांचा की अन्य घटकांचा असो त्यांच्यामध्ये एक प्रकारचे सामंजस्य निर्माण करण्याची भूमिका वारकऱ्यांच्या विचारात प्रकर्षाने मांडली जात आहे.

 

त्याचाच पुरस्कार करणे, ते रुजवणे, ते शक्तिशाली करणे, आज खऱ्या अर्थाने आवश्यक आहे. ती आवश्यकता,भागवत वारकरी संमेलनाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये रुजू शकतो. त्याचबरोबर शरद पवार यांनी सध्याच्या स्थितीत देशांमध्ये जाती जातीत भेदभाव, वितुष्ट आणि द्वेष, आणि जातीयतेचे विष पसरवणाऱ्या परिस्थितीवरही भाष्य केले. याबाबत बोलताना ते म्हणाले की,कुठलाही धर्म चुकीच्या प्रवृत्तीच्या समर्थन करत नाही. भागवत वारकरी संमेलन ही संकल्पना माणुसकी घराघरात पोहोचवण्याचा संदेश करते. आज समाजामध्ये एक अस्वस्थता आहे चुकीच्या प्रवृत्ती प्रस्तावित करण्याची भूमिका काही घटक घेत आहेत. असे म्हणत त्यांनी देशातील आणि राज्यातील जाती धर्माबद्दल तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीवरही सडकून टीका केली.त्याचबरोबर काही चुकीच्या प्रवृत्ती प्रोस्ताहीत करण्याची भूमिका काही घटक घेत असल्याने,सामान्य माणूस जो अस्वस्थ आहे. त्याची अस्वस्थता काढून टाकण्यासाठी,त्याला मानसिक समाधान देण्यासाठी,त्याचा मन शक्तिमान करण्यासाठी,जो काही पर्याय समाजासमोर आहे.त्याच्यामध्ये भागवत वारकरी संमेलनचा विचार आपण दुर्लक्षित करू शकत नाही.असा विचार केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मांडला.आज देशांमध्ये वेगवेगळे घटक,वेगवेगळ्या पद्धतीने, आपली पाऊल टाकत आहे. तर दुसऱ्या बाजूने अन्याय, अत्याचार, हे चित्र एका बाजूला आणि धर्म आणि कट्टरता विचाराच्या माध्यमातून कर्मकांड आणि या गोष्टीचा पुरस्कार ही भूमिका दुसऱ्या बाजूला, असे आपल्याला बघायला मिळते.माझ्या मते कुठलाही धर्म चुकीच्या प्रवृत्तीच समर्थन कधी करत नाही.चुकीचे संस्कार कधी समाजावर करत नाही. योग्य विचार देण्याची खबरदारी संबंधित समाज घेत असतो. तसेच त्यांनी आपल्या विचारातून देशातील एकता,अखंडता कायम अबाधित राहावी, जाती-धर्मात समाजात भेदभाव असू नये हा बोध भागवत वारकरी संमेलनाच्या या कार्यक्रमातून दिला.

 

यावेळी त्यांच्या हस्ते सन्माननीय सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला. तसेच वारकरी वैष्णव संप्रदाय या ग्रंथाचे,व आजादी सुवर्ण इतिहास स्री क्रांतीचा या पुस्तकाचे प्रकाशन, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ह भ प दिनकर शास्त्री भुकेले माऊलींचे चोपदार राजाभाऊ रंधवे, माजी आमदार विलास लांडे,माजी सभापती प्रकाश मस्के, आळंदीचे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे,तुषार कामठे, विकास लवांडे, श्यामसुंदर महाराज सोन्नार,सतीश काळे, प्रियंका चौधरी,तसेच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार महाराज मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर मत व्यक्त करताना ते म्हणाले की आज सबंध देशांमध्ये एका बाजूला सनातन धर्म.आणि दुसऱ्या बाजूला भागवत धर्म.यासंबंधीची चर्चा हल्ली मोठ्या प्रमाणात होत असते.मी एकच गोष्ट सांगतो,आम्ही याकडे बघत असताना.सामान्य माणसाची हिताची जपणूक करणारी विचारधारा आहे.समाजाला शक्तिशाली करणारी ही विचारधारा आहे.देशाला कष्टकऱ्यांना महासत्ता बनवणारी जी विचारधारा,ती विचारधारा आम्हा सर्वांच्या दृष्टीने अंतिम विचारधारा आहे. ही विचारधारा वारकरी संस्थान आहे,ती विचारधारा जतन करणे, ही तुमची माझी जबाबदारी आहे.असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भाषणात मत व्यक्त केले.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे