राजकिय

टाकळीभानच्या मुरकुटे गटाचे परत मनोमिलन सर्व सदस्यांच्या सहकार्याने कारभार पाहणार…. सरपंच अर्चनाताई रणनवरे

टाकळीभानच्या मुरकुटे गटाचे परत मनोमिलन सर्व सदस्यांच्या सहकार्याने कारभार पाहणार…. सरपंच अर्चनाताई रणनवरे

 

टाकळीभान प्रतिनिधी: मुरकुटे साहेबांचा एकच गट असून मुरकुटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांच्या सहकार्याने व सर्वांना सोबत घेऊन गावच्या विकासासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन टाकळीभानच्या सरपंच अर्चनाताई रणनवरे यांनी केले. मुरकुटे समर्थकांच्या बैठकी प्रसंगी त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे खुलासा केला. यामध्ये त्या म्हणाल्या की आम्ही लोकनेते माजी आमदार भानुदासजी मुरकुटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून ग्राम विकासासाठी सर्व सदस्यांना एकत्र घेऊन काम करणार आहे. मध्यंतरी एकाच गटामध्ये आमचे किरकोळ मतभेद झाले होते ते दूर झाले असून मुरकुटे साहेबांचे नेतृत्व आम्हाला मान्य असून आमचे नेते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच गाव विकासाचे काम करणार असून शासनाच्या विविध योजना राबविणार असल्याचे त्या म्हणाल्या.

आम्ही खालील सह्या करणारे सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी सरपंच सौ.अर्चना यशवंत रणनवरे सुनील तुकाराम बोडखे सदस्य सौ. लता भाऊसाहेब पटारे सदस्या जाहीर खुलासा करतो की,

गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही गैरसमजातून पत्रकार परिषद घेऊन आमच्या संघटनेतील वरिष्ठ नेते मंडळी आणि सहकाऱ्यांवर कामकाजात हस्तक्षेप करत असल्याबाबत व दूरदृष्टी नसल्याचे आरोप केले होते. सदर परिस्थिती गैर समजुतीमुळे उद्भवली होती 

परंतु अशी परिस्थिती नसून आमचा गैरसमज दूर झालेला आहे. आमचे नेते व सर्वच सहकारी हे सदैव आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. त्यांनी आमच्या ग्रामपंचायतच्या कारभारात कुठलाही हस्तक्षेप कधीच केलेला नाही. त्यांच्याकडे दूरदृष्टी असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली विकासाची वाटचाल सुरू आहे.

ग्रामपंचायतीत काम करत असताना सर्व १७ सदस्यांची आम्हाला अमूल्य साथ असून पुढील वाटचाल ही माजी आमदार श्री. भानुदासजी मुरकुटे साहेब यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू राहील.

२०२१ ला झालेल्या निवडणुकीत टाकळीभानच्या ग्रामस्थांनी आम्हाला १६-१ अशा फरकाने ऐतिहासिक असा विजय मिळवून दिला होता. परंतु काही कारणास्तव मतभेद झाल्याने गैरसमज वाढत गेले व सदस्य मंडळात दुफळी निर्माण झाली होती. मात्र आता आम्ही सर्वच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच कामकाज करू असा खुलासा सरपंच या नात्याने मी करत आहे. यावेळी मुरकुटे गटाची सदस्य समवेत बैठक पार पडली यावेळी ज्येष्ठ नेते ज्ञानदेव साळुंके, कारेगाव मागचे संचालक शिवाजीराव शिंदे, मा. व्हा. चेअरमन दत्तात्रय नाईक ,सरपंच पती, अशोकचे संचालक यशवंत रणनवरे ,मार्केट कमिटीचे संचालक मयूर पटारे, ग्राम. सदस्य सुनील बोडखे,भाऊसाहेब पटारे, माजी संचालक बापूराव त्रिभुवन ,संजय रणवरे आदी यावेळी उपस्थित होते.

 

 हे मनो मिलन पुन्हा घडवून आणणारा, आणि गेलेली सत्ता पुन्हा एकदा मुरकुटेच्या गटात खेचून आणणारा , खरा चाणक्य कोण ?अशी चर्चा टाकळीभान पंचक्रोशीत ग्रामस्थांमध्ये रंगू लागली आहे,

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे