रमजान ईद अक्षय तृतीया परशुराम जयंतीच्या एकमेकांना शुभेच्छा देत हिंदु मुस्लीम बाधवांनी साजरे केले सण
रमजान ईद अक्षय तृतीया परशुराम जयंतीच्या एकमेकांना शुभेच्छा देत हिंदु मुस्लीम बाधवांनी साजरे केले सण
बेलापुर येथील ईदगाह मैदानावर मौलाना शकील अहमद यांनी ईदची नमाज अदा केली मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदान तसेच मस्जिद मध्ये ईद उल फित्रची नमाज अदा करुन एकमेकांना शुभेच्छा देत रमजान ईद साजरी केली येथील उक्कलगाव चौफुलीवर असलेल्या ईदगाह मैदानावर मौलाना शकील अहमद यांनी सर्व मुस्लीम बांधवांना महीनाभर केलेले उपवास तसेच अल्लातालाकडे केलेली याचना मंजुर होवुन गावात तालुक्यात जिल्ह्यात तसेच राज्यात देशात शांतता नांदुन सुख समृद्धी व भरभराट होवो अशा शुभेच्छा दिल्या या वेळी मा जि प सदस्य शरद नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा सोसायटीचे चेअरमन सुधीर नवले कै मुरलीधर खटोड पतसंस्थेचा चेअरमन रविंद्र खटोड माजी सरपंच भरत साळूंके आरपीआयच्या वतीने रमेश अमोलीक पत्रकारांच्या वतीने देविदास देसाई पोलीसांच्या वतीने ऐपीआय बोरसे प्रदेश तेली महासंघाच्या वतीने एकनाथ उर्फ लहानु नागले भाजपाचे प्रफुल्ल डावरे आदिंनी मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या तसेच हिंदु बांधवांना अक्षय तृतीयाच्या तसेच परशुराम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच प्रशासनाच्या वतीने योग्य सहकार्य केल्याबद्दल ऐपीआय बोरसे यांचा सत्कार सर्फराज सय्यद जाकीर शेख जब्बार अत्तार शफीक बागवान यांनी सत्कार केला या वेळी जाफरभाई आतार मोहसीन सय्यद अब्रार सय्यद हाजी ईस्माईल शेख यांनी हिंदु बांधवांना अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या