आषाढी एकादशीच्या दिवशी येणाऱ्या बकरीईदला कुर्बानी न देण्याचा मुस्लीम बांधवांचा ऐतिहासीक निर्णय.

आषाढी एकादशीच्या दिवशी येणाऱ्या बकरीईदला कुर्बानी न देण्याचा मुस्लीम बांधवांचा ऐतिहासीक निर्णय.
मुस्लिम धर्मियांचा बकरीईद सण व हिंदु धर्मियांची आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असुन मुस्लिम बांधवांनी हिंदु बांधवांच्या भावनांचा सन्मान करत बकरीईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. बेलापुर येथे नुकतीच शांतता कमीटीची बैठक संपन्न झाली. त्यात सर्व मुस्लीम बांधवांनी हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले असुन त्यांच्या निर्णयाचे हिंदु बांधवांनी तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे .
बेलापुर येथे नुकतीच शांतता कमीटीची बैठक श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मुस्लीम बांधवाचा सण बकरीईद तसेच हिंदू बांधवांचा पवित्र आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असुन त्या दिवशी काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता कमीटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाच्या वतीने काही सुचना करण्याच्या आगोदरच मुस्लीम बांधवांनी जाहीरपणे सांगितले की आम्ही सर्व जण कायमच एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत आहोत. आषाढी एकादशी हा हिंदु बांधवांचा मोठा व पवित्र सण आहे. या दिवशी सर्व हिंदु बांधव पुजाअर्चा करुन उपवास करतात. याच दिवशी मुस्लीम बांधवांचा कुर्बानी देण्याचा सण बकरीईद येत आहे. त्यामुळे हिंदु बांधवांच्या भावनांचा आदर करुन दोन दिवस कुर्बानी न देण्याचा निर्णय आम्ही सर्व मुस्लीम बांधवांनी सर्वानुमते घेतला.
असल्याचे हाजी ईस्माईल शेख, मोहसीन सय्यद, बाबुलाल शेख, अयाजअली सय्यद, जाकीर शेख ,अजीज शेख यांनी सांगितले. मुस्लीम बांधवांनी हा ऐतिहासीक निर्णय घेतला असुन या निर्णयांचे हिंदु बांधवाच्या तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. बेलापुर गावाने नेहमीच समाजापुढे आदर्श ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे. सर्वात प्रथम विना पोलीस बंदोबस्ताशिवाय गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडण्याचा यशस्वी निर्णय घेतला. त्यानंतर गाव सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याचा धाडसी निर्णय गावाने घेतला होता. गावाने दिपावली निमित्त आपली खरेदी आपल्या गावातच हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला तसेच राम मंदिराचे कोषाध्यक्ष बेलापूर गावचे वैभव आचार्य गोविंददेवगीरीजी महाराज यांच्याकडे राम मंदिर उभारणीसाठी ७५ हजार रुपये देण्याचा देशातील पहीला मान बेलापुरच्या मुस्लीम बांधवांनी मिळवीला तसेच संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे मुस्लीम बांधवांनी जागोजागी स्वागत केले आता आषाढी एकादशी व द्वादशी या दोन दिवस कुर्बानी न देण्याचा धाडसी निर्णय बेलापुरच्या मुस्लीम बांधवांनी घेतला आहे. राज्यात नव्हे देशात असा निर्णय घेणारे बेलापुर हे पहीले गाव ठरले आहे. या वेळी जि प सदस्य शरद नवले ,उपसरपंच अभिषेक खंडागळे ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक ,मोहसीन सय्यद, प्रफुल्ल डावरे, हाजी ईस्माईल शेख, पास्टर अलिशा जोगदंड, एकनाथ नागले, देविदास देसाई, शिवसेनेचे अशोक पवार, विष्णूपंत डावरे आदिंनी मनोगत व्यक्त केले समाजापुढे आदर्श ठेवण्याचे काम नेहमीच या गावाने केले असुन सण उत्सव शांततेत पार पाडा या करीता घेण्यात आलेल्या शांतता समीतीच्या बैठकीत मुस्लीम बांधवांनी एक वेगळाच आदर्श घालुन दिला असल्याचे मत पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी व्यक्त केले.
या वेळी बेलापुरात नुकत्याच झालेल्या राजकीय भूकंपावरुन शरद नवले अरुण पा नाईक अभिषेक खंडागळे यांनी भाषणात केलेल्या शेरेबाजीमुळे उपस्थितामध्ये हशा पिकला ग्रामपंचायत सदर रविंद्र खटोड, अशोक गवते, मुस्ताक शेख,रमेश आमोलीक ,मिस्टर शेलार ,जिना शेख दादा कुताळ, जाफरभाई आतार, जब्बार आतार, गोपी दाणी रफीक शेख, प्रदीप शेलार, अकीला पटेल, ईस्माईल आतार, सागर ढवळे ,किशोर महापुरे, फतेमोहंमद ईनामदार, हाफीज शेख, कासम शेख सहाय्यक फौजदार सुधीर हापसे ,हवालदार सोमनाथ गाडेकर ,हवालदार शफीक शेख पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ,नंदकिशोर लोखंडे आदिसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक देविदास देसाई यांनी केले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे यांनी आभार मानले. *आमच्या शेजारीच हिंदु बांधव राहतात आषाढी एकादशीला ते धार्मिक विधी पुजाअर्चा करुन उपवास करतात.त्याच दिवशी बकरीईद आली असुन त्यांच्या धर्माचा धार्मिक भावनांचा आदर करुन त्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे* शफीक आतार *या गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असुन येथील मंदिर व मस्जिदची एकच भिंत आहे. मुस्लीम बांधवांनी आषाढी एकदशीच्या दिवशीच येणाऱ्या बकरीईदला कुर्बानी न देण्याचा धाडसी निर्णय घेतला असुन दोन समाजात सामंजस्य, प्रेम, सदभावना वाढविण्याच्या दृष्टीने टाकलेले हे महत्वाचे पाऊल आहे*.
*आणखी एक विनंती आहे की* *कुर्बानी देताना गाय किंवा गोवं जनावरांची* *कुर्बानी देवु* *नये* पंडीत महेश व्यास