श्री संत सोपान काका यांच्या दिंडीचे पहिले रिंगण सोमेश्वर नगरी येथे पार पडले तर दुसरे रिंगण माळेगाव बुद्रुक येथे

श्री संत सोपान काका यांच्या दिंडीचे पहिले रिंगण सोमेश्वर नगरी येथे पार पडले तर दुसरे रिंगण माळेगाव बुद्रुक येथे
श्री संत सोपान काका यांची दिंडी सोहळा गुरवारी सासवड वरुन प्रस्थान झाली आणि
टाळकरी, वारकरी, पताकाधारी यांच्यासह मजल मजल दरमजल करत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघाली आहे. हा पालखी सोहळा सोमेश्वर नगरी येथुन निघुन माळेगाव बुद्रुक येथे दुसरे रिंगण सांयकाळी 5 वाजता माळेगाव बुद्रुक येथे दुसरे रिंगण पार पडले आहे.भक्त मंडळ, सेवेकऱ्यांच्या वतीने जय्यत तयार केली असुन केवळ वरून राजाची आगमनाची प्रतिक्षा आहे.
श्रीसंत सोपान काका यांची पालखी विठूरायाच्या दर्शनासाठी जात आसताना गेली अनेक वर्षापासून माळेगाव बुद्रुक नगरीत मुक्कामी थांबते. प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी पालखी सोहळा जेष्ट वैद्य 20जुन रोजी सायंकाळी माळेगाव बुद्रुक नगरीत दाखल होत असुन भक्त मंडळाच्या वतीने पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. हा सोहळा शहरातील ढोलताश्या, टाळ, मृदंग व हरिनामाच्या गजरात 9 जुन रोजी सकाळी नाश्ता करून पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. पालखी दर्शन सोहळ्याचा लाभ शहरी, ग्रामीण भागातील भावीक भक्तानी घेण्याचे अवाहान संत सोपान काका महाराज यांच्या ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे