ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या उपस्थितीत ह्या सोहळ्याचे वितरण

*शारदा प्रतिष्ठानचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर*
*ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या उपस्थितीत ह्या सोहळ्याचे वितरण करण्यात आले*.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणी गुरूजनांचा गौरव करण्याच्या उद्देशाने शारदा प्रतिष्ठान सातत्याने मागील तेरा वर्षे आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करत आहे. दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या औचित्याने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये १४ व्या पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
गेवराई विधानसभा मतदार संघातील गुणी गुरूजनांचा गौरव व्हावा, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शारदा प्रतिष्ठान, गेवराई या सामाजिक स्वयंसेवी संस्थेकडून सातत्याने शिक्षक दिनी मागील १३ वर्षे आदर्श शिक्षक पुरस्कार देवून शिक्षकांचा सन्मान केला जात आहे. सोमवार, दि.५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता गोदावरी सभागृह, र.भ.अट्टल महाविद्यालय गेवराई येथे कार्यक्रम संपन्न झाला
या वेळी शारदा प्रतिष्ठान निवड समितीने ११ आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आल्याले शिक्षक
भाऊसाहेब किसनराव हातमोडे, जि.प.प्रा.शाळा रोहितळ, सुनिल महारुद्र नलावडे, जि.प.प्रा.शाळा गायरान वस्ती लोळदगाव, महादेव रामभाऊ खेडकर, जि.प.प्रा.शाळा, टोकाडेवस्ती उक्कडपिंप्री, सुभाष जगन्नाथ काळे, जि.प.प्रा.शाळा, खंडोबावस्ती उमापूर, राम दिनकरराव जोशी, जि.प.प्रा.शाळा, राजापूर फाटा, लक्ष्मीकांत माणिक साळवे, जि.प.प्रा.शाळा, सौंदाणा, भारत श्रीराम ढेपे, जि.प.प्रा.शाळा, श्रृंगारवाडी, मोहंमद मुर्तूजा मोहंमद हुसेन, जि.प.प्रा.शाळा, आहेरवाहेगाव, प्राचार्या डॉ.रजनी शिखरे, र.भ.अट्टल महाविद्यायलय, गेवराई, हरिनारायण मारुती कोकाट, जय भवानी विद्यालय, गढी, लक्ष्मण रुपसिंग सोनवणे, जि.प.प्रा.शाळा, पोईतांडा या शिक्षकास पुरस्कार म्हनुन सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र,शाल-श्रीफळ देवून त्यांचा या सोहळ्यात सपत्नीक गौरव करत शारदा प्रतिष्ठानच्या आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.
या वेळी उपस्थित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस,प्रतिष्ठानचे
कार्यवाह अमरसिंह पंडित,जि.प.माजी.अध्यक्ष विजयसिंह पंडित,युवा नेते रणवीर पडीत,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर,बाजार समितीचे सभापती जगनपाटील काळे,जय भवानी कारखन्याचे व्हाईस चेहरमन जगन्नाथ शिंदे,भवानी अर्बन बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे,माजी सभापती पाटीलबा मस्के,गट शिक्षणाधिकारी पडीत गोपाळघरे,निवड समिती अध्यक्ष नारायणराव मोटे आदी मान्यवर उपस्थित होते.