तिंतरवणी येथे 4 वर्षापासून हायवे 61 रोडवर पाणीच मारले नाही

तिंतरवणी येथे 4 वर्षापासून हायवे 61 रोडवर पाणीच मारले नाही
मौजे तिंतरवणी येथून मुंबई विशाखापटनम 61 नंबर हायवे जात आहे.
तिंतरवणी गावामध्ये बस स्टैंड वर तीनशे मीटर रोड काही कारणामुळे कच्चा ठेवण्यात आलेला आहे.
त्या तीनशे मीटरवर मुरूम टाकल्याने प्रचंड धूळ उडत आहे . रोडवर प्रतिदिन रहदारी जास्तच वाढलेली आहे.
वाहन गेल्यानंतर धुळीचा फवारा असा उठतो, की आसपासचे दुकानं घर यावर धुळीचा लेप चढतो. हा त्रास गेल्या चार वर्षापासून तिंतरवणी गावातील नागरिक सहन करत आहेत.
कागदोपत्री दोन वेळा पाणी मारले जाते ,असे रोड प्राधिकरणाचे म्हणणे जर खरे मानायचे ठरल्यास गावातील लोकांना मूर्ख बनवण्या सारखे होईल. गेल्या चार वर्षात केवळ दोन ट्रॅक्टर पाणी मारताना ग्रामस्थांनी पाहिले आहे . रस्त्यावर उभे असलेली वाहन कपड्याचे दुकान किराणा दुकान व बस स्टँड वर असलेल्या घरांना प्रचंड धुळीचा त्रास झालेला आहे . आणि हा त्रास फक्त रोड प्राधिकरणाच्या हरकती मुळे झालेला आहे . गावामध्ये फार मोठा आक्रोश असून गावकरी जनहित याचिका तयार करण्याच्या तयारीत आहेत. त्याचप्रमाणे रस्ता रोको सुद्धा केला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच काही ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत रोडवर पाणी मारण्याचे रेकॉर्ड चेक करण्यात यावे. अशा प्रकारच्या धुळीच्या साम्राज्यात तिंतरवणी ग्रामस्थांना का जीवन कटावे लागले यास कारणीभूत असणाऱ्या वर व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी ग्रामस्थ जनतेची मागणी आहे.
व ग्रामस्थांना रोड प्राधिकरणाने वेठीस धरली त्यांच्या आरोग्याची खेळल्यामुळे नुकसान भरपाईचा दावा का करण्यात येऊ नये .असे समस्त गाव ग्रामस्थ मंडळीचे म्हणणे आहे.
बोल लवकरात लवकर या संदर्भात गावात मीटिंग होऊन मोर्चा व आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.