धार्मिक

मानोरी येथील रेणुका माता नवरात्र उत्सवासाठी श्री क्षेत्र माहूरगड ते श्रीक्षेत्र मानोरी नवरात्र उत्सव ज्योत आणण्यासाठी तरुण मार्गस्थ

मानोरी येथील रेणुका माता नवरात्र उत्सवासाठी श्री क्षेत्र माहूरगड ते श्रीक्षेत्र मानोरी नवरात्र उत्सव ज्योत आणण्यासाठी तरुण मार्गस्थ

 

राहुरी तालुक्यातील मानोरी येथील रेणुका माता नवरात्र उत्सवासाठी श्री क्षेत्र माहूरगड ते श्रीक्षेत्र मानोरी नवरात्र उत्सव ज्योत आणण्यासाठी मानोरी येथील पन्नास हुन अधिक तरुण रवाना झाले रेणुका माता भगवती संस्थान व सार्वजनिक देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गेनुजी नारायण पाटील आढाव यांच्या संकल्पनेतून सालाबाद प्रमाणे याही वर्षी मानोरी येथील श्री रेणुका माता भगवती संस्थान व सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट आयोजित श्रीक्षेत्र मानोरी येथून श्री क्षेत्र माहूरगड येथे दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता गावातील 50 हून अधिक तरुण रवाना झाले यामध्ये कैलास पाटील बापूसाहेब आढाव रवींद्र निवृत्ती आढाव किशोर आढाव अमोल भिंगारे मनोज ठुबे जितेंद्र तनपुरे विशाल महाडिक अनिकेत पोटे ऋषिकेश पोटे सुजित पोटे प्रताप थोरात चंदू आढाव गोवर्धन आढाव भाऊसाहेब चोथे मंगेश दळवी राहुल पारदे शिवाजी जाधव किसन पोटे रमेश जाधव बालू भाऊ जाधव प्रवीण कोळसे बाळासाहेब वाघमारे आकाश पोटे ज्ञानेश्वर पोटे दीपक जाधव संदीप गुंड कल्याण थोरात गणेश आढाव सागर जाधव योगेश जाधव ऋषिकेश जाधव जालिंदर वाकचौरे अर्जुन बर्डे सागर जाधव हे सर्व तरुण माहुरगडला रवाना झाले या तरुणांना शुभेच्छा देण्यासाठी धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नानासाहेब आढाव हरिभक्त परायण शंभू बाबा गोसावी ज्येष्ठ नागरिक कचरू नाना आढाव डॉक्टर तनपुरे कारखान्याची संचालक उत्तमराव आढाव माजी संचालक निवृत्ती नाना आढाव अहमदनगर जिल्हा माध्यमिक सोसायटीचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक उत्तमराव खुळे सर संपत थोरात आप्पासाहेब आढाव सोपान आढाव दिलीप आढाव नानासाहेब तनपुरे माधवराव आढाव मनोज खुळे चंद्रभान आढाव मोठ्या संख्येने मानोरी ग्रामस्थांनी तरुण भाविकांना शुभेच्छा दिल्या तसेच दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी श्री क्षेत्र माहूरगड येथून तरुण ज्योत घेऊन प्रस्थान करणार आहेत दुपारी पुसद माहूरगड रोड येथे विश्रांती सायंकाळी वाशिम पाटील ढाबा येथे मुक्काम दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी वाशिम येथून प्रस्थान दुपारी मेहकर बायपास जालना रोड येथे विश्रांती सायंकाळी सिंदखेड राजा येथे मुक्काम 24 सप्टेंबर रोजी सकाळी सिंदखेडराजा येथून प्रस्थान तर दुपारी हॉटेल जय भवानी करमाड येथे विश्रांती तर सायंकाळी लिंबे जळगाव हनुमान मंदिर येथे मुक्काम 25 सप्टेंबर रोजी सकाळी लिंबे जळगाव येथून प्रस्थान दुपारी श्री संत ज्ञानेश्वर संस्थान नेवासा येथे विश्रांती सायंकाळी पानेगाव तालुका नेवासा येथे मुक्काम तर दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता श्री रेणुका माता मंदिर मानोरी येथे ज्योत आगमन तसेच ज्योत विधिवत पूजेनंतर भव्य मिरवणूक सोहळा करण्यात येणार असल्याचेही माहिती मिळाली श्रीक्षेत्र माहूरगड ते श्रीक्षेत्र मानोरी येथे ज्योत आणण्यासाठी सर्व एकूण पाच दिवसांचा हा प्रवास असून या प्रवासासाठी या सर्व तरुण भाविकांसाठी अन्नदान चहापान नाष्टा हा विविध क्षेत्रात कार्यरत असलेले भाविक नानासाहेब गेनुजी आढाव निवृत्ती गवजी आढाव

 जनार्दन भाऊसाहेब पाटील लक्ष्मण भानुदास आढाव बापूसाहेब भीमराज वाघ जयंत अशोक जाधव साहेब बाजीराव बाळाजी आढाव सुरेश रामचंद्र दिवे सचिन राजेंद्र साबळे मिनीनाथ संपत थोरात राजूभाऊ शेटे मित्र मंडळ मानोरी जयराम सखाराम पठारे अण्णासाहेब नाथाची तोडमल सचिन बाळासाहेब आढाव श्रीकांत पोपट शिंदे साहेब मुंबई महेश शंकर शेळके शरद वसंत ढोकणे अशोक भागवत खुळे सोपान गहूजी आढाव दिगंबर ज्ञानदेव जाधव या सर्व भाविकांनी ज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरुण भाविकांना उत्तम प्रकारचे जेवण चहा नाश्ता याची सोय केली तसेच या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य खासदार सुजय दादा विखे पाटील आमदार श्री प्राजक्ता दादा तनपुरे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे पाटील राहुरी पंचायत समितीचे सदस्य सुरेश दादा बनकर यवतमाळ येथील रवी लोन चुने पाटील पांडुरंग देवळे अकोले राजेंद्र वाघ कायगाव ईश्वर उकिरडे पाटील करमळ पानेगाव ग्रामपंचायतचे सरपंच संजय जंगले पाटील यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले सलग दोन वर्ष कोविड या महामारीमुळे नवरात्रोत्सव साजरा करण्यात आलेला नाही यावर्षी सर्वांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे तसेच या नवरात्रोत्सवामध्ये आई रेणुका माता चे दर्शनाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नानासाहेब आढाव यांच्याकडून करण्यात आले

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे