अपघात

दोन कार धडकल्या: मुलाला दवाखान्यात घेऊन निघालेली महिला पोलीस व तिचा मुलगा मृत्युमुखी तर दोन जण जखमी*

*दोन कार धडकल्या: मुलाला दवाखान्यात घेऊन निघालेली महिला पोलीस व तिचा मुलगा मृत्युमुखी तर दोन जण जखमी*

 

सिरसाळा-परळी रोडवर आज सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान दोन करची समोरासमोर धडक होऊन भिषण अपघात झाला. या अपघातात दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी कोमल शिंदे व त्यांचा ९ वर्षाचा मुलगा यांचा मृत्यू झाला. तर पोलीस कर्मचारी नवनाथ लटपटे तसेच डॉक्टर डॉ. इलियास गंभीर जखमी झाले आहेत. 

         जखमींना तात्काळ सिरसाळा पोलीसांनी व नागरिकांनी अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. दिंद्रुड येथून आलेली एम एच १४ , जि वाय ९११३, एस क्रॉस कंपनी ची पांढ-या रंगाची गाडी परळी कडे जात होती, जिच्या मध्ये दिंद्रुड पोलीस कर्मचारी होते.परळीहून एम एच ४७,०५३२६ काळवट रंगाची इंडीवर गाडी ज्यात परळी चे शासकीय डॉक्टर डॉ. इलियास असल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात सिरसाळा येथील परळी रोडवरील प्रगती मंगल कार्यालया समोर घडला. अपघात एवढा भिषण होता कि दोन्ही गाड्या रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात एकमेकावर पडल्या आहेत.

 

• दरम्यान ,कोमल शिंदे आपल्या मुलाला दवाखान्यात घेऊन जात होत्या. कोमल शिंदे ह्या दिंद्रुड पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा आजारी असल्याने त्या मुलाला उपचारासाठी परळीच्या दवाखान्यात निघाल्या होत्या.रस्त्यातच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे