महाराष्ट्र

टेल टॅंक परिसरातील विहिरीत मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला

टेल टॅंक परिसरातील विहिरीत मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला 

टाकळीभान प्रतिनिधी :- टाकळीभान टेल टॅंक परिसरातील द्वारकाबाई नामदेव वाघुले यांच्या शेतातील विहिरीत मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला आहे, 

    सविस्तर वृत्त असे की तेल टॅंक शेजारी द्वारकाबाई नामदेव वाघुले गट नंबर 106 या शेतातील जुनाट विहिर आहे ,त्या शेतात बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता बबलू राधाकिसन वाघुले,चक्कर मारण्यासाठी गेला असता , दुर्गंधीचा वास आला, त्यांनी विहिरीकडे जाऊन डोकावून पाहिले असता पाण्यावर बिबट्या मूर्त अवस्थेत फुगून वर आलेला दिसून आला, बबलू वाघुले यांनी ताबडतोब फॉरेस्ट कर्मचारी आयुष्यमान बढे यांच्याशी संपर्क साधून माहिती कळवली, पण अंधार पडल्याने असल्यामुळे विहिरीवर झाडे झुडपं जास्त व जुनाट विहीर असल्याने, बिबट्यास वर काढणे शक्य होणार नाही, म्हणून गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठिक 11 वाजता फॉरेस्ट अधिकारी विलास डगळे, आयुष्यमान बढे व त्यांचे सहकारी व शेतकरी बबलू वाघुले घटनास्थळी येऊन विहिरीमध्ये बाज सोडून बिबट्यास वर काढून रीतसर पंचनामा व पोस्टमार्टम करून मृत बिबट्याची विल्हेवाट लावली

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे