राजकिय

गावाच्या विकासासाठी तनपुरे कुटुंबियांचे मोठे योगदान असून आम्ही सर्वजण गटतट विसरून एकत्र आलो 

गावाच्या विकासासाठी तनपुरे कुटुंबियांचे मोठे योगदान असून आम्ही सर्वजण गटतट विसरून एकत्र आलो 

गावाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण गटतट विसरून एकत्र आलो असून गावाच्या विकासासाठी तनपुरे कुटुंबियांचे मोठे योगदान असून आम्ही आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांना साथ देणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सौ ताराबाई भिमराज वाघ ह्यांनी यावेळी सांगितले.

मानोरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा माजी खासदार प्रसाद तनपुरे व माजी नगराध्यक्षा डॉ सौ उषाताई तनपुरे ह्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी रेणुका माता मंडळाच्या नवनिर्वाचित सरपंच ताराबाई वाघ बोलत होत्या.यावेळी रेणुका माता मंडळाचे मार्गदर्शक भिमराज (बाळू काका )वाघ सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.

मानोरी गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन गटामध्ये सरळ लढत होऊन ह्यामध्ये रेणुकामाता १३ उमेदवार निवडून आले असून ह्यात वाघ ह्यांचे ६ पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र आढाव ह्यांचे ६ तर माजी सरपंच दयावान शेख १ उमेदवार निवडून आले असून हे सर्व जण गट तट पक्ष विसरून केवळ गावाच्या विकासासाठी एकत्र आले आहे.

यावेळी बोलताना माजी खासदार प्रसाद तनपुरे म्हणाले की माझ्या आमदारकीच्या काळात मानोरी गावाला भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे. मुळा व प्रवरा नदीवर जी बंधाऱ्याची मालिका तयार केल्याने नदीकाठचा परिसरात आज जे उसाचे क्षेत्र तयार आहे. तिथे १० लाख टन ऊस उपलब्ध असून ह्याच उसावर आज जिल्ह्यातील सर्व कारखाने सुरु आहे. जे कारखाने ऊस तालुक्यातून घेऊन जातात त्या नेत्यांना त्यांचे भागात उसाचे क्षेत्र तयार करता आले नाही. मानोरी बंधाऱ्याच्या साठी लाखो रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याने मानोरी सह आसपासच्या गावांचा विकास झाला आहे. तालुक्याचा आमदार नसतानाही बंधाऱ्याच्या दुरुस्ती साठी रस्त्यासाठी लाखो रुपये उपलब्ध करून दिले.गावाच्या राजकारणा बरोबर तालुक्याचे राजकारणात सर्वानी प्राजक्त तनपुरे ह्यांना सहकार्य करावे असे आवाहन श्री तनपुरे ह्यांनी केले.

प्राजक्त तनपुरे आमदार झाले मंत्री झाले त्यांनी मानोरी ६ ते ७ कोटी रुपयाचा निधी दिल्याने आज मानोरी गावाचे तरुण युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठी मागे उभे आहे. केवळ स्थानिक राजकारणा मुळे सर्वानी हेवेदावे, गट तट विसरून विकासासाठी एकत्र आलो असून भविष्यात आम्ही प्राजक्त दादा तनपुरे ह्यांचे मागे उभे राहून विकास कामे करवून घेणार आहोत.

यावेळी डॉ सौ उषाताई तनपुरे ह्यांचे हस्ते सरपंच सौ ताराबाई वाघ, सदस्य सोनाली संजय पिले,रेणुका गजानन थोरात, वैशाली उत्तम खुळे, हिराबाई गंगाधर भिंगारे,अलका अशोक भिंगारे,सुमन दिनकर आढाव तर माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांनी रेणुकामाता मंडळाचे मार्गदर्शक भिमराज (बाळू काका )वाघ, दिलशाह चांद पठाण, एकनाथ भिमराज आढाव, सुनील आनंदा पोटे,दादासाहेब माधव आढाव,शामराव गोविंद आढाव, नानासाहेब गेणुजी आढाव,कारभारी बाबुराव बर्डे, पोपटराव पोटे,बापूसाहेब वाघ, वैभव पवार, किरण भिंगारे चाँदभाई पठाण आदिचा सत्कार करण्यात आला.

युवक कार्यकर्ते किरण भिंगारे यावेळी म्हणाले की पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव ह्यांचे मार्गदर्शन लाभले असून आम्ही 6 सदस्य रेणुका माता मंडळाचे बरोबर आघाडी केली. व निवडून आलो आहोत.त्यांनी माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांनी त्यांचे आमदारकीच्या काळात तसेच विद्यमान आमदार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अवघ्या अडीच वर्षात मानोरी गावाच्या विकासासाठी 7 कोटी उपलब्ध करून दिले असून शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न मार्गी लावला असून भविष्यात त्यांचेकडून गावासाठी आणखी निधी आणून गावाचा विकास करण्यासाठी मानोरी व परिसरातील युवकांचा त्यांचे पाठीमागे खंबीर पणे उभा राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे श्री आढाव ह्यांनी सांगितले.

 

मानोरी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सरपंच सौ ताराबाई वाघ व नवनिर्वाचित सदस्य ह्यांचा सत्कार माजी खासदार प्रसाद तनपुरे व माजी नगराध्यक्ष डॉ सौ उषाताई तनपुरे आदि.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे