अंगणवाडी गटाच्या वतीने धमाल पालक -बालक मेळावा संपन्न

टाकळीभान अंगणवाडी गटाच्या वतीने धमाल पालक -बालक मेळावा संपन्न
टाकळीभान प्रतिनिधी : एकात्मिक बाल विकास सेवा योजना श्रीरामपूर अंतर्गत टाकळीभान गटाच्या वतीने, टाकळीभान येथे करूया धमाल मजा मस्ती या संकल्पनेच्या माध्यमातून आरंभ पालक -बालक मेळाव्याचे शुभारंभ ग्रामपंचायत सदस्य सौ दिपाली खंडागळे व सौ अर्चना पवार हस्ते करण्यात आले.
लहान बाल गोपाळांच्या बौद्धिक विकासाचे व सुसंस्काराचे केंद्र असलेल्या अंगणवाडी शाळेमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंचे काम अभिमानास्पद असून त्यांच्या चांगल्या व संस्कारक्षम पायाभरणीमुळे भविष्यात उत्तम विद्यार्थी घडतात असे प्रतिपादन सौ दिपाली खंडागळे कार्यक्रम प्रसंगी त्यांनी अध्यक्षीय भषणात केले.
या कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी पर्यवेक्षिका आशाताई खेडकर यांनी केले होते,
यावेळी कार्यक्रम प्रसंगी ग्रा. सदस्या सौ.लता पटारे, पर्यवेक्षिका कल्पना फासाटे , टाकळीभान गटाच्या पर्यवेक्षिका आशा खेडकर, माजी प्रवेशिका मंगला राजळे उपस्थित होत्या.
यावेळी कल्पना फासाटे प्रास्ताविक करताना म्हणाल्या की खाजगी शाळेच्या ठिकाणी वर्षाला लाखो रुपयांची फी भरण्यापेक्षा येथील अंगणवाडी शाळेमध्ये मोफत शिक्षण मिळून मुलांची उत्तम काळजी घेतली जाते. मुलांना संस्कारक्षम शिक्षण त्याबरोबरच त्यांना उत्तम पोषण आहार, बौद्धिक विकासासाठी विविध मार्गाने शिकवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. अंगणवाडी सेविका व मदतनीस या मार्फत पालक महिला भगिनींना मुलांच्या विकासाकरता वेळोवेळी मार्गदर्शन ही केले जाते. अंगणवाडीमध्ये लहान बालगोपाळांच्या विकासाकरता विविध उपक्रम राबवले जातात.
कार्यक्रम प्रसंगी उपस्थित महिला पालक यांनीही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामाचे मनोगतातून कौतुक केले.यावेळी भविष्याचे झाड, मुलांची वजन -उंची, साप शिडी, संवेदनशील विकास, अनौपचारिक शिक्षण कोष,सेल्फी पॉइट, बाहुबली घर, बाळ कोपरा, पोषण मळा, मेंदूचे जाळे, गंध ज्ञान, स्पर्श-ज्ञान, घरगुती वाद्य,पाण्याचे खेळ, बाळाला हसून दाखवा, वृद्धी आलेख, गरोदर माता ओटी भरण, जादूची गुहा आदी उपक्रम पार पडले.
याप्रसंगी काही बाल गोपाळांनी संगीत गाण्यावर धमाल नृत्य सादर करून उपस्थितांची करमणूक केली.
याप्रसंगी टाकळीभान अंगणवाडी गटातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा उत्कृष्ट कामाबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी टाकळीभान गटातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन राऊत यांनी केले. सर्वांचे आभार टाकळीभान अंगणवाडी गटाच्या पर्यवेक्षिका आशा खेडकर यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने टाकळीभान अंगणवाडी गटातील शिक्षिका व सेविका मोठ्या संख्येने हजर होते व पालक उपस्थित होते.