चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून राबविलेल्या विशेष मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी 150 विना नंबर प्लेट गाड्यांवर दंडात्मक कारवाई कारवाई*
मोहिमेच्या दोन दिवसांमध्ये एकूण 251 विना नंबर प्लेट गाड्यांवर कारवाई.*
*चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून राबविलेल्या विशेष मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी 150 विना नंबर प्लेट गाड्यांवर दंडात्मक कारवाई कारवाई*
*150 गड्यांपैकी 20 गाड्यांची कागदपत्र सादर न केल्याने पोलीस स्टेशनला जमा*
*मोहिमेच्या दोन दिवसांमध्ये एकूण 251 विना नंबर प्लेट गाड्यांवर कारवाई.*
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बऱ्याचशा दुचाकी गाड्या ह्या चोरांकडून अल्प दरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जातात अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशन ने आज दिनांक 4 10 2024 रोजी पासून विना नंबर प्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली होती.
सदर मोहिमे च्या पहिल्या दिवशी एकूण 101 दुचाकी वाहने विना नंबर प्लेटची आढळून आली.
तर आज दुसऱ्या दिवशी एकूण 150 विना नंबर प्लेट गाड्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
आजच्या कारवाईतील 150 दुचाकी वाहनांपैकी 130 वाहनांवर दोन्ही बाजूच्या नंबर प्लेट बसवून वाहने मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे .
उर्वरित 20 वाहनां ची कागदपत्रे अद्याप पर्यंत नागरिकांनी हजर न केल्याने ती वाहने पोलीस स्टेशन येथे जमा आहेत.
राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपल्या दुचाकी चार चाकी वाहनांवर पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेट बसून घ्याव्यात जेणेकरून विनाकारण दंड भरण्याची वेळ येणार नाही.. तसेच सर्व नागरिकांनी नंबर प्लेट बसवलेले असल्यास चोरीचे वाहन शोध ही सोपा होईल.
सदर चोरीचे वाहन शोध मोहीम ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे, अमोल पवार, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे धर्मराज पाटील समाधान फडोळ ,सुदर्शन बोडखे, विष्णू आहेर , सहाय्यक फौजदार फुलारी, पो.हेड कॉन्स्टेबल बाबा शेळके, हनुमंत आव्हाड, संदीप ठाणगे, संजय राठोड, सोमनाथ जायभाय, राहुल यादव, बबन राठोड, बापू फुलमाळी, रामनाथ सानप,पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, प्रमोद ढाकणे, सचिन ताजने, सतीश कुराडे, ठोंबरे, गोवर्धन कदम,जालिंदर धायगुडे, गणेश लीपणे, रवी पवार, आदिनाथ पाखरे, रवींद्र कांबळे, संतोष राठोड, रोहित पालवे समादेशक आरिफ इनामदार तसेच होमगार्ड भागवत तनपुरे, भाऊसाहेब जाधव, यशवंत बाचकर, दीपक जाधव, महेश मस्के, काशिनाथ चव्हाण, संजय ढसाळ, रमेश आघाव, भाऊसाहेब धनेधर, प्रमोद जाधव , संजय इंगळे, ओंकार उंडे, चांगदेव कोबरने, बाळासाहेब वराळे, ऋषिकेश ढगे, गणेश नवले, अशोक मोहिते, काशिनाथ उमाप, विनोद ससाने, शामवेल ससाने, सुफियान पठाण, सिद्धार्थ घोडके, गोरख राऊत, गणेश खरमाळे, आदिनाथ ढोकणे यांच्या पथकाने केलेली आहे.