श्रीरामपूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीशी लग्न लावणाऱ्या नवरदेवासह त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीशी लग्न लावणाऱ्या नवरदेवासह त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल
एका अल्पवयीन मुलीशी विवाह लावून दिल्याप्रकरणी कनोली येथील नवरदेवास त्याच्या आई-वडिलांच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस सात बालविवाह प्रतिबंध अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह मंगळवार( 2 मे) रोजी तालुक्यातील कनोली येथे वराच्या घरासमोरच संगनमताने लावून देण्यात आला होता
याबाबत माहिती समजल्यानंतर ग्रामसेवक रवींद्र केशव शिंदे, हनुमंत गाव तालुका राहाता यांनी अल्पवयीन मुलीचा जन्म दाखला आणि आधार कार्ड मागविले असता त्यात जन्मतारखेची खात्री व चौकशी केली असता मुलीचे वय कमी असल्याचे आढळून आले.
याबाबत कनोली गावचे ग्रामसेवक यांनी तालुका पोलीसांत दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी नवरदेव प्रवीण पोपट वर्पे (वय २९) त्याचे वडील पोपटएकनाथ वर्पे,आई रंजना पोपट वर्पे तिघे रा कनोली तालुका संगमनेर व पीडित मुलीची आई या चार जणांविरोधात अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देऊन बाल विवाह प्रतिबंध अधिनियमाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास ढूमने यांच्या मार्गदर्शना खाली उपनिरीक्षक राजेंद्र सानप करत आहे.