अपघात
वृत्तपत्र विक्रेते अशोक दरंदले यांचे निधन.

वृत्तपत्र विक्रेते अशोक दरंदले यांचे निधन.
सोनई नेवासा फाटा येथे वृत्तपत्र विक्रेते अशोक श्यामसुंदर दरंदले (वय-५६) यांचे आज दुपारी ३ वाजता दुःखद निधन झाले आहे. मागील आठवडय़ात नेवासाफाटा येथे झालेल्या अपघातात जखमी झाले होते.नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज दुपारी त्यांचे निधन झाले. मागील ३५ वर्षांपासून त्यांचा नेवासा फाटा येथे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय असल्याने परिसरात ते लोकप्रिय होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे आई,पत्नी, २ मुले, २ भाऊ असा परिवार आहे.उद्योजक नामदेव दरंदले व पत्रकार विनायक दरंदले यांचे पुतणे तर
पत्रकार चंद्रकांत दरंदले व डाॅ.रविंद्र दरंदले यांचे ते मोठे बंधू होत.
——————————-