आधारवेल फाऊंडेशन कडून ग्रामीण भागातील तरुणांसाठी भरविण्यात आलेल्या वन डे मॅच ला खेळाडू व क्रिकेट चाहत्यांचा भर पावसात उत्स्फूर्त प्रतिसाद*.

*आधारवेल फाऊंडेशन कडून ग्रामीण भागातील तरुणांसाठी भरविण्यात आलेल्या वन डे मॅच ला खेळाडू व क्रिकेट चाहत्यांचा भर पावसात उत्स्फूर्त प्रतिसाद*.
*दि.10/7/2022 रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मोदी ग्राउंडवर आधारवेल फाऊंडेशन च्या वतीने आधारवेलच्या संस्थापक अध्यक्षा व जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या सौ.वैशालीताई नान्नोर यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंची खेळाडू वृत्ती जोपासली जावी व खेळात प्राविण्य मिळून त्यांचा नावलौकिक व्हावा यासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंचक्रोशीतील गावांमधील क्रिकेट प्रेमी खेळाडूंसाठी आधारवेल ने “एक गाव एक संघ” ही संकल्पना राबवून “वन डे अशा एकदिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धेचे नियोजन बद्ध आयोजन केले होते .यात मोठ्या उत्साहाने संघ सहभागी झाले होते*.
*राहुरी पोलीस स्टेशनचे दबंग पोलीस अधिकारी PI श्री प्रताप दराडे साहेब यांच्या हस्ते या भव्य क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. सदृढ व निरोगी राहण्यासाठी जीवनात खेळाला महत्व असून तरुणांनी खेळात आपले नावलौकिक करावे असा संदेश त्यांनी तरुणांना दिला व आधारवेलच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून आधारवेलला शुभेच्छा दिल्या*.
*शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री आप्पासाहेब ढूस ,राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार श्री शिवाजी घाडगे यांनी देखील मनोगतातून नान्नोर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून आधारवेल व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या .तसेच नगरचे क्रिकेट आयकॉन सुनिल खर्डे ,मोरया ग्रुप चे श्री गोरख अडसुरे, राहुरी खुर्दचे युनूस भाई शेख, राजुभाई शेख, पत्रकार गोरक्ष वाघमोडे सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब करमड ,दादासाहेब कोहकडे , डिग्रसचे सरपंच राजुभाऊ बेल्हेकर ,आव्हाड सर सह अनेकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या*.
*या वेळी आधारवेलच्या वतीने वैशालीताई नान्नोर यांनी सहभागी झालेल्या आठ संघातील प्रत्येक खेळाडूला मोफत “टी-शर्ट व कॅप वाटप केले ” तसेच खेळाडूंसाठी व क्रिकेट चाहत्यांसाठी साबुदाणा खिचडीचे आयोजन करण्यात आले होते*.
*पाऊस चालू असताना देखील नान्नोर यांनी स्वतः नियोजनबद्ध पध्दतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत निच्चीत झालेले आठ ही संघ भर पावसात मोठ्या उत्साहाने स्पर्धेत मैदानात उतरले आणि संपूर्ण दिवसभरात स्पर्धेचा आनंद लुटत अगदी खेळीमेळीच्या वातावरणात हे सामने पार पडले*.
*सहभागी झालेल्या कोणत्याही संघाकडून प्रवेश फी न आकारता अगदी मोफत ग्रामीण भागातील खेळाडूंसाठीच फक्त या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . ग्रामीण भागातील खेळाडूंना स्वतःचे नावलौकिक करण्यासाठी एक सुवर्णसंधी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व खेळाडूंनी वैशालीताई नान्नोर यांचे आभार मांडले*.