आठवडे बाजारातील चोऱ्या रोखण्यासाठी कर्जत पोलिसांकडून नवी “शक्कल “

आठवडे बाजारातील चोऱ्या रोखण्यासाठी कर्जत पोलिसांकडून नवी “शक्कल “
तालुक्यातील कर्जत,राशीन,मिरजगावात पोलीस निरीक्षकांनी सुरू केली अनाऊन्सिंग सिस्टीम
आठवडे बाजारात चोरी करणाऱ्या अनेक पुरुष व महिलांना अनेकदा पकडले आहे. तरी तालुक्यातील कर्जत शहरासह मिरजगाव व राशीन या मोठ्या आठवडे बाजारातील चोऱ्या रोखणे कर्जत पोलिसांसमोर मोठे आव्हानच होते. चोरटे गर्दीचा फायदा घेऊन दुचाकी, मोबाईल, पर्स, रोकड रक्कम चोरीची अनेक प्रकरणे वारंवार घडत होते . परंतु या चोऱ्या रोखाव्यात म्हणुन कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये सतत जनजागृती केली, पोलिसांच्या गस्तीही वाढवल्या आहेत . मात्र चोरीच्या घटनाच घडू नयेत व नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आता यादव यांनी आता आठवडे बाजारात ‘अनाऊन्सिंग सिस्टीमची’ शक्कल लढवली आहे.
कर्जत तालुक्यातील मोठ्या बाजारात अनाऊन्सिंग सिस्टीमची जोडणी करून बाजारात खरेदीसाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाला पोलिसांनी दिलेल्या सुचना ऐकायला मिळत आहेत. यामध्ये मोबाईल वरच्या खिशात न ठेवता तो खालच्या खिशात ठेवावा, महिलांनी आपल्या पर्स, महागड्या वस्तू व्यवस्थित सांभाळून ठेवाव्यात आदी सुचना दिल्या जात आहेत. तसेच चोरी बाबतच्या काही हालचाली आढळल्या तर लगेच तेथील पोलिसांना कळवा’ अशा अनेक सुचना नागरिकांना दिल्या जात आहेत. याअगोदर अनेक मोबाईल चोरांना, पर्स चोरांना जेरबंद करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे.परंतु एवढे करूनही गर्दीचा फायदा घेऊन संधी साधणाऱ्या चोरट्यांना रोखणे ही कठीण बाब कठीण झाले आहे. अनेकवेळा बाजारात भाजी पाला, किराणा किंवा साहित्य विकत घेताना महिला व पुरुष त्या वस्तू आपल्या पिशवीत ठेवण्यासाठी खाली वाकतात.याचाच फायदा घेऊन चोरटे संधी साधतात. चोरटे बाजारातील खरेदीदार नागरिकांच्या शेजारी उभे राहून भाजीपाला खरेदीचा खोटा बहाणा करतात आणि क्षणात मोबाईल, पर्स व इतर वस्तूंवर डल्ला मारतात.काही वेळात आपल्याला चोरी झाल्याचे समजते परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे ‘नागरिकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून होणाऱ्या नुकसानीस टाळावे” असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे. आता पोलिसांनी लढवलेल्या या शक्कलीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत असुनही .अनेक चोरट्यांना या सिस्टिममुळे जरब बसला आहे. त्यामुळे बाजारात होणाऱ्या चोऱ्यांना आळा बसत आहे.नागरीकांना सुरक्षितता तसेच त्यांच्या वस्तू वा मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी कर्जत पोलीस जीव ओतून काम करत आहेत असे पोलिसांनी सांगितले.
कर्जत तालुक्यात भरणाऱ्या मोठ्या आठवडे बाजारांमध्ये परराज्यातील चोरट्यांचे प्रमाण वाढले आहे.अनेक मोबाईल चोरीच्या प्रकरणात तसेच वेगवेगळ्या बाजारात कर्जत पोलिसांनी अशा चोरट्यांना जेरबंद केले आहे.चोरी केल्यानंतर पलायन करून स्वतःच्या गावी हे चोरटे जात आहेत. त्यामुळे अशा चोरट्यांना रोखण्यासाठी पोलीस पेट्रोलिंगसह अनाऊन्सिंग सिस्टीमचा चांगलाच उपयोग होत आहे.
चंद्रशेखर यादव – पोलीस निरीक्षक कर्जत.