सुजाता इंटरनॅशनल स्कुल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स सोनई*_ _*।। विठ्ठल नामाची शाळा भरली।।*_

. _*सुजाता इंटरनॅशनल स्कुल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स सोनई*_
_*।। विठ्ठल नामाची शाळा भरली।।*_
साजरी होत असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी, भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. विठुराया अन् आषाढीचे महत्त्व शाळांमधील चिमुकल्यांनाही समजावे, या उद्देशाने आज शनिवारी सुजाता इंटरनॅशनल स्कुल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, सोनई मध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. वृक्षदिंडी, वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडी, रिंगण ,अभंग आणि भक्तीगीतांवर मुलांचे नृत्य व गायन तसेच विविध सांस्कृतिक देखावे असे अनेक उपक्रम यावेळी राबविण्यात आले. चिमुकल्यांनी विठुनामाचा जयघोष करीत त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शाळेच्या पटांगणात ज्ञानोबा-माऊलींच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठलाच्या महाआरतीने करण्यात आली व सर्व शाळेचा परिसर विठूनामाणे दुमदुमून गेला होता चारशेपेक्षा जास्तवेगवेगळ्या अभंगांवर शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनि ,शिक्षकवृंदाने आणि पालकांनी फेर धरून, फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. या सोहळ्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’ होते . पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थी भगवा झेंडा हाती घेऊन यात सामील झाले होते, तर विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या. पावसाच्या रिमझिम सरींतला हा सोहळा पाण्यासाठी पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. या सोहळ्याची पसायदानाने सांगता करण्यात आली. तसेच शाळेचे संस्थापक श्री.किरण सोनवणे सर व प्राचार्य श्री.सचिन चांडे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना एकादशीच्या शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पुंड सर यांनी केले व श्री बाळकुमार डमाळे , श्री.रोहित लहाड, उर्मिला साळुंके, सुरेखा कर्जुले, प्रांजल दरंदले, सुजाता दरंदले, कामक्षा दरंदले, भारती शेटे, प्रीती देशमाने, उषा आदमने, कल्पना शेटे, सविता जाधव,पल्लवी तनपुरे , संध्या गायकवाड, बाराहते वंदना, गडाख स्वाती, अर्चना दरंदले, तोडमल सुवर्णा, कैतके स्वाती, निमसे सोनाली व शरद सोनवणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.