माळंगी शेगुड ग्रुप सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी दिलीप आडसूळ तर व्हाइस चेअरमन पदी विष्णु गलांडे यांची बिनविरोध निवड

माळंगी शेगुड ग्रुप सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी दिलीप आडसूळ तर व्हाइस चेअरमन पदी विष्णु गलांडे यांची बिनविरोध निवड
कर्जत प्रतिनिधी – कर्जत तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी शेगुड- माळंगी- निंबे आणि डोंबाळवाडी अशा चार गावांसाठी असलेल्या वि.वि.कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक जय मल्हार शेतकरी विकास पॅनेल च्या नावाने तसेच शांतीलाल मासाळ, बापुसाहेब खामगळ, दत्ताभाऊ डोंबाळे, संदीप शेगडे, अनुरथ जगताप, भाऊसाहेब डोंबाळे, नानासाहेब खामगळ, आणि गहीनीनाथ डोंबाळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली होती. यावेळी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व १३ संचालक या जय मल्हार शेतकरी विकास पॅनेलचे निवडून आले आहेत. यात दिलीप आडसुळ, विष्णू गलांडे, शांतीलाल मासाळ, बाबासाहेब डोंबाळे, नानासाहेब खामगळ, बंडू शेगडे, हनुमंत नलावडे, महारुद्र जगताप, गहिनीनाथ ढेकळे, बाबासाहेब वाघमारे, मुसाभाई बागवान, शालन मासाळ, तसेच भिमाबाई कोपनर यांची सदस्य म्हणून निवडून आले आहेत. आज या सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनची निवड करण्यात आली. चेअरमन पदी दिलीप आडसूळ तर व्हाइस चेअरमन पदी विष्णु गलांडे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडी वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पांडुरंग डोंबाळे, सतीश जगताप, विजू मोरे, विठ्ठल पारखे, नागाप्पा बेरगळ, चंद्रकांत पांढरे, रघुनाथ मासाळ, नवनाथ थोरात, नाना शेगडे, तात्यासाहेब शेगडे, शंकर खामगळ, मधुकर अडसूळ, गोरख डोंबाळे, दत्तात्रय गलांडे, मगनदास कोपनर, बाबासाहेब मासाळ, दादासाहेब खामगळ, दादासाहेब मासाळ, दादा नलवडे, परमेश्वर कोकाटे, मुजावर बागवान, लालासाहेब वाघमारे, वैभव शिंदे, काशिनाथ जगताप, बापूराव ढेकळे, हनुमंत कोपनर, हनुमंत ढेकळे, संभाजी महाराज जरक, दामोदर लोखंडे, दत्तात्रय खामगळ, प्रकाश शिरसाट, भगवान ढेकळे, हरिभाऊ गलांडे, सुनील गलांडे, बबन पांढरे, बबन डोंबाळे, तुकाराम खामगळ, सुभाष मासाळ, विठ्ठल मासाळ, छगन शिरसाट, शिवाजी डोंबाळे, बाबासाहेब पारखे, सुनील अडसूळ, भीमराव काळे, शांतीलाल डोंबाळे, दिलीप खामगळ, गोविंद मारकड, पांडुरंग काळे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नुतन चेअरमन व व्हाईस चेअरमन तसेच सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून साहेबराव पाटील यांनी काम पाहिले.