तालुक्यातील राजापूर व माठ या गावांसाठी एस.टी बस पूर्वरत चालू करण्यासाठी वंचित चे शिरूर आगाराला निवेदन

श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर व माठ या गावांसाठी एस.टी बस पूर्वरत चालू करण्यासाठी वंचित चे शिरूर आगाराला निवेदन
श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर व माठ या गावांसाठी एस.टी बस पूर्वरत चालू करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने शिरूर आगाराला नुकतेच निवेदन दिले आहे.
प्रामुख्याने श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर माठ हे महत्त्वपूर्ण असे गाव आहे या गावांना अनेक वाड्या व वस्त्या आहेत या गावातील रस्त्यांची समस्या बिकट आहेतच, परंतु नागरिकांच्या मूलभूत सुख सुविधांचाही बोजेवारा झाला आहे, या गावांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी व कामगार वर्ग शिरूर देवदैठण, ढवळगाव या ठिकाणी विद्यार्थी शिकण्यासाठी जात असतात तसेच रांजणगाव कारेगाव एमआयडीसी व सुपा एमआयडीसी या ठिकाणी कामगार वर्ग मोठ्या संख्येने कामाला जात असतो शिरूर येथे मोठी बाजारपेठ असल्यामुळे याही ठिकाणी या गावातील व पंचक्रोशीतील लोकांना शिरूर येथे जावा लागते. परंतु एसटी चालू नसल्यामुळे विद्यार्थी- विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता येत नाही भारत स्वतंत्र होऊनही या गावांमध्ये अजूनही एसटीची सुविधा चालू होत नाही हे मोठे दुर्दैव आहे. या गावातील तालुकास्तरीय लोकप्रतिनिधींनी याकडे कधी लक्ष दिले नाही. त्यामुळे राजापूर गावातील वंचित बहुजन आघाडीच्या शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः होऊन शिरूर आगार प्रमुखाला निवेदन देत आपल्या व्यथा सांगत लवकरात लवकर एसटी चालू करावी अशी विनंती केली आहे आगारप्रमुखांनीही त्याला हिरवा कंदील देत येत्या काही दिवसांमध्ये लवकरात लवकर एसटी शिरूर आगारामार्फत चालू करू व विद्यार्थ्यांचे शाळेचे होणारे नुकसान नक्कीच टाळू असेही त्यांनी सांगितले. या निवेदनात म्हटले आहे की खूप वर्षापासून गावा मधे एस.टी.येत नाही, काही वर्षापूर्वी राजापूर- माठ ही मुक्कामी एस.टी येत होती,परंतु कालांतराने ती सुद्धा बंद झाली. या कारणाने राजापुर-माठ गावातील विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे हाल आणि शैक्षणीक नुकसान होत आहे. गावातील काही मुले-मुली गैरसोयी मुळे पुढील शिक्षण सोडून देत आहेत. कृपया राजापूर-माठ किंवा दुसरा पर्यायी मार्गावरून एस.टी पुन्हा पूर्वरत चालु करावी आणि विद्यार्थी आणि नागरिकांचे होणाऱ्या गैरसोयीची आपण दखल घ्यावी. अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जठार,तालुकाध्यक्षय संतोष जोंजाळ, राजापूर शाखा अध्यक्ष विजय माने,शाखा उपाध्यक्ष मनोज रणदिवे,महासचिव कुमोद रणदिवे,सचिव नितीन रणदिवे,पवन रणदिवे,अशोक रणदिवे,नवनाथ पवार,श्रीकांत जाधव,जितेंद्र जाधव,कैलास जाधव,अविनाश जाधव आणी इतर विदयार्थी व तरुण उपस्थित होते.