छञपती शिवाजी महाराजांचाछञपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत पारंपारीक वाद्याच्या गजरात निघालेल्या शिवजयंती मिरवणुकी जयजयकार करत पारंपारीक वाद्याच्या गजरात निघाली शिवजयंती मिरवणुक

छञपती शिवाजी महाराजांचा जयजयकार
करत पारंपारीक वाद्याच्या गजरात निघाली शिवजयंती मिरवणुक
छञपती शिवाजी महाराजांचा जयजयकार
करत पारंपारीक वाद्याच्या गजरात निघालेल्या शिवजयंती मिरवणुकीने सोमवारी राहुरीचे वातावरण भक्तीमय झाले होते. शिवसेनेच्या मिरवणुकीत लेण्याद्री तरूण मंडळाचे झांजपथक तसेच हिंदू ग्रुपच्या मिरवणुक राॅकस्टार ५१ बॅण्ड हे पथक आकर्षण ठरले.
२१ मार्च ही छञपती शिवाजी महाराजांची
३९२ वी जयंती राहुरी शहरात जल्लोषात साजरी करण्यात आली.शिवजयंती निमित्त शहरातील चौकाचौकात भगवे झेंडे लावण्यात आले होते.
शिवसेनेच्या वतीने राहुरीतील पाण्याच्या टाकी जवळील चौकात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.माजी खासदार प्रसाद तनपुरे,
विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे,
शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे,
तहसिलदार फसियोद्दीन शेख,पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी ताराचंद तनपुरे,हर्ष तनपुरे,नगरसेवक बाळासाहेब उंडे.पोपट शिरसाठ. सुनिल शेलार. राजु सातभाई. सचिन म्हसे. सरपंच गणेश खेवरे .औकार खेवरे. भाना तमनर( सर ) विजय शिरसाठ
सह शिवसैनिक उपस्थित होते.
दुसरी मिरवणुक राहुरीतील हिंदू ग्रुपच्या
वतीने काढण्यात आली.ढोलताशाच्या गजरात निघालेली मिरवणुक शहरातील बैजनाथ मंदिराजवळ येताच रावसाहेब चाचा तनपुरे,
माजी नगराध्यक्ष अनिल कासार,पञकार राजेंद्र वाडेकर,गणेश खैरे,नारायण धोंगडे,सुनील पवार यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.