महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मनसेच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना किराणा वाटप

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मनसेच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना किराणा वाटप

 

बेलापुर (प्रतिनिधी )-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूरच्या वतीने एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना किराणा वाटप करण्यात आला असुन मनसेच्या या उपक्रमामुळे गेल्या चार महीन्यापासून अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे मनसेच्या वतीने याही वर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे जिल्हा सचिव संजय नवथर विधानसभा अध्यक्ष संतोष डहाळे तालुकाध्यक्ष बाबा रोकडे शहराध्यक्ष निलेश नाम गणेश दिवशी यांच्या हस्ते नगरपालिका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे मनाले की आम्ही वीस ते पंचवीस वर्षापासून शिवजयंती निमित्त विविध प्रकारचे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम व गोरगरीब लोकांना मदत करण्याचे उपक्रम राबवत असतो गेल्या काही महीन्यापासून एस टी महामंडळाचे कर्मचारी आपल्या उचित मागण्यासाठी संपावर गेलेले आहेत त्यांच्या मागणीची दखल शासन घेत नाही कर्मचारी तर आपल्या मागण्यावर ठाम आहेत त्यामुळे महामंडळाचे सर्व कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहे त्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न मनसेच्या वतीने करण्यात आला असुन गरजु कुटुंबांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले आहे शिवजयंतीच्या निमित्ताने श्रीरामपूरातील 100 गरजवंत कुटुंबांना किराणा वाटप करण्यात आला आसुन यापुढे नेवासा संगमनेर या तालुक्यातील एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना किराणा वाटपाचा कार्यक्रम करणार आहोत व त्यांना इतरी जी काही मदत लागेल ती मदत करण्याची प्रयत्न करणार आहोत जोपर्यंत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना साथ देऊ झोपी गेलेल्या शासनाला जागे करण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असे या प्रसंगी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले
याप्रसंगी विद्यार्थी सेना जिल्हा सचिव विशाल शिरसाठ कामगार सेना तालुकाध्यक्ष किशोर वाडीले बबन माघाडे भास्कर सरोदे संतोष भालेराव दीपक लांडे निलेश सोनवणे दीपक सोनवणे राजू शिंदे मनोज जाधव अरुण बोराडे राम थोरात अतुल खरात महेश कोलते सुमित गोसावी मंगेश जाधव प्रसाद शिंदे ज्ञानेश्वर काळे संतोष आवटी मारुती शिंदे विजय शेळके महादेव होवळ विकी शिंदे दादासाहेब बनकर ऋषिकेश खरात सोमनाथ कासार आकाश कापसे अनिल शिंदे गणेश रोकडे किशोर बनसोडे राहुल शिंदे बाबाजी शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे