घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये सिस्टर कक्ष व कर्मचारी वर्ग गायब रुग्ण उपचारा पासून वंचित

घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये सिस्टर कक्ष व कर्मचारी वर्ग गायब
रुग्ण उपचारा पासून वंचित
सोनई. घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालय 14 फेब्रुवारी 2022 रोजी मोठ्या गाजावाजा करुन घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन पार पडले 9 कोटी 35 लाख रुपये खर्च करून ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले. . ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचा वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे,परंतु ते कामावर उशिरा येतात,दुपारी 3 वाजेनंतर रुग्णालय मध्ये पेशंट आले तर कोणताच कर्मचारी रुग्णालयात मध्ये उपस्थित राहत नाही.डाॅ.घोगरे ( सिव्हिल सर्जन अहमदनगर) यांना भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे नेवासा तालुका अध्यक्ष रवी भाऊ आल्हाट यांनी संपर्क केला असता ते सांगतात की तुम्ही ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. आसपासच्या गावांमधून ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे पेशंट येत असतात येथे कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांची गैरसोय होते. ग्रामीण रुग्णालय मध्ये केस पेपर विभागात दुपारी तीन वाजेनंतर कोणीच राहत नाही.घोडेगाव ग्रामीण रुग्णालयातील बाल रोग तज्ञ विभागातील डॉक्टर एक वर्षापासून रूग्णालयात उपस्थित राहत नाहीत सर्वसामान्य जनतेसाठी या रुग्णालयांमध्ये भरपूर सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत परंतु कर्मचारी वर्ग उपस्थित नसल्याने याचा लाभ जनतेला घेता येत नाही. घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी वर्ग उपस्थित नसल्यामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे, आसपासच्या गावांमधून रुग्ण याठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात पण चांगला कर्मचारी वर्ग नसल्याकारणाने त्यांना परत त्रास सहन करावा लागत आहे.तरी याची दखल घेतली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे असे नेवासा तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष रवी भाऊ आल्लाट व सर्व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्यकर्ते उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.