सरपंच सर्जेराव घाडगे यांना सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार नुकताच प्रदान

राहुरी तालुक्यातील कणगर गावचे लोकनियुक्त सरपंच सर्जेराव घाडगे यांना सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
कणगर गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध योजनांच्या सहाय्याने सर्वसामान्य जनतेसाठी विविध विकास कामे करून तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सर्जेराव घाडगे यांनी लौकिक मिळविला.त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून घाडगे यांना सरपंच सेवा संघाच्या वतीनआदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
घाडगे यांना आ.निलेश लंके,पद्मश्री राहिबाई पोपेरे,ग्रामसेवा संघटनेचे राज्यअध्यक्ष एकनाथ ढाकणे,संस्थापक सरपंच सेवा संघ यादवराव पावसे,बाबासाहेब पावसे,राधेशाम गुंजाळ,रोहित पवार,अमोल शेवाळे,रविंद्र पवार,रविंद्र पावसे,निलेश पावसे,ह.भ.प.राजेंद्र गरुड आदींच्या उपस्थित पुरस्कार वितरण करण्यात आले.
घाडगे यांनी लोकसहभागातून वाड्या वस्त्यांवर जाणाऱ्या रस्त्यांवर मुरुमीकरण करून लोकांना जाण्या-येण्यासाठी चांगले रस्ते तयार केले.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्त्यांसाठी वर्षभरात 1 कोटी रुपयांचे निधी – डांबरी रस्त्यांसाठी पाठपुरावा करून मंजूर करून आणला. त्याची काही कामे पूर्ण झाले असून काही कामे सुरू आहेत.तसेच गावातील उर्दू शाळा इमारत व अंगणवाडी इमारत व इतर जि.प.शाळा व अंगणवाडी यांना भरभरून विविध प्रकारच्या सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न केला.
कोरोना महामारीच्या काळात ग्रामस्तरावर जिल्हा परिषद शाळेत 20 बेडचे कोरंटाईन सेंटर उभारणी केली.व सिटी स्कॅन च्या 12 स्कोर पर्यंतचे पेशंट यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या CHO डॉ.सौ.खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील खाजगी डॉ. संदीप हारदे व आरोग्य सेविका सौ.सीमा अल्हाट व आशा सेविका,अंगणवाडी सेविका,जि.प.शाळेतील शिक्षक,कामगार तलाठी,पोलीस पाटील ग्रामविकास अधिकारी, जि. परिषद सदस्य,वग्रामपंचायत सदस्य, सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते,ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सहकार्याने व गावाच्या आर्थिक व मानसिक मदतीने यशस्वीरित्या चालविले.
घाडगे यांना आर्दश सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल मग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.तसेच तालुक्यातील विविध सामाजिक व राजकीय संस्थांनी देखील सर्जेराव घाडगे यांचा सत्कार केला.