टाकळीभान ते श्री. क्षेत्र देवगड पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन.

टाकळीभान ते श्री. क्षेत्र देवगड पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान ते श्री. क्षेत्र देवगड भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक २५ मार्च रोजी करण्यात आले असून जास्तीत जास्त भाविकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी
केले आहे.
श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या आशिर्वादाने व प.पू.गुरुवर्य महंत श्री. भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथी निमीत्त श्री क्षेत्र टाकळीभान ते श्री क्षेत्र देवगड भव्य पायी दिंडी पालखी सोहळा आयोजित केला आहे
ह.भ.प.राधेशाम महाराज पाडांगळे, संतोष महाराज पटारे, सुदाम महाराज चौधरी, रविंद्र महाराज गांगुर्डे, संगिताताई शेजुळ,आंबादास महाराज वाकडे,
रामभाऊ घोडे मृदुंगवादक, काशिनाथ बाबा बनसोडे, कोंडीराम महाराज पेचे, चंदन महाराज पारखे, ज्ञानोबा माऊली राशीनकर, गोरक्ष महाराज राशीनकर, नवनाथ महाराज मुंगसे, सचिन महाराज वाघुले यांचे मार्गदर्शनाखाली पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून दिंडीचे प्रस्थान श्री विठ्ठल मंदिर टाकळीभान शुक्रवार दि. २५/३/२०२२ रोजी सकाळी ५.३० वाजता होणार आहे.
या सोहळ्यात किसनगिरी बाबा भक्त मंडळ, समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ टाकळीभान, घोगरगांव, बेलपिंपळगांव, कमालपूर, चेंडूफळ, घुमनदेव, गुजरवाडी सहभागी होणार आहेत.